BJP Leader Molestation Case : 'तुला मूलबाळ होत नाही; मी करून देतो...' : विदर्भातील भाजप नेत्यावर साळ्याच्या बायकोच्या विनयभंगाचा आरोप, गुन्हा दाखल

BJP leader accused in harassment case: विदर्भातील एका भाजप नेत्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
FIR filed against BJP leader in Vidarbha
FIR filed against BJP leader in VidarbhaSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha BJP leader accused of molestation: गोंडपिपरी तालुका भाजपचे महामंत्री भानेश येग्गेवार यांच्यावर साळ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 जून रविवारी गोंडपिपरी पोलिसांनी ही कार्यवाही केली.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे साळूच्या १९ वर्षीय पत्नीचा विनयभंग करून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे तालुका महामंत्री तथा माजी पंचायत समिती सभापतीचे पती भानेश येगेवार यांच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

FIR filed against BJP leader in Vidarbha
Nasrapur Murder Case : नराधम भीमराव कांबळेला फाशीचीच शिक्षा! संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या नसरापूर प्रकणातील चिमुरडीला अखेर न्याय मिळाला

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २१ जून रोजी भंगाराम तळोधी येथील भानेश येग्गेवार यांच्या शेतात कापूस बियाण्यांची पेरणी सुरू होती. बियाणे संपल्याने ते आणण्यासाठी तक्रारदार महिला आणि भानेश येगेवार हे गावातील साळूच्या घरी गेले.

त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून तुला वर्षभरापासून मूलबाळ होत नाही. मी तुला मूलबाळ करून देतो असे म्हणत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिला कुणाला काही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित महिलेला स्थानिक मराठी भाषा अवगत नसल्याने तिला तक्रार दाखल करण्यास विलंब झाला.

FIR filed against BJP leader in Vidarbha
Parbhani: ठाकरेंची साथ सोडण्याआधीच फुटीर खासदाराने केली होती एकनाथ शिंदेंना मदत : विधानपरिषद निवडणुकीसंबंधात धक्कादायक खुलासा

कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि पाहुण्यांच्या मदतीने अखेर २७ जून रोजी तिने गोंडपिपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत गोंडपिपरीचे पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भानेश पोचू येग्गेवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी फरार असून पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com