Washim News : चौकशीचे आदेश धडकताच ग्रामपंचायतीला आग : रेकॉर्डसह महत्त्वाच्या फाईल्सचे नुकसान

Gram Panchayat Fire: १५ व्या वित्त आयोगाच्या कामांच्या चौकशीसाठी रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर माळेगाव नजीक किन्ही ग्रामपंचायत कार्यालयाला पहाटे आग लागली. फाईल्स, दस्तऐवज, संगणक व साहित्याचे नुकसान झाले.
Gram Panchayat Fire
A gram panchayat office in caught fire after records were sought for an inquirySarkarnama
Published on
Updated on

Kinhi Gram Panchayat : वाशिम जिल्ह्यातील माळेगाव तालुक्यातील किन्ही ग्रामपंचायत कार्यालय मंगळवारी (ता. २२) पहाटेच्या सुमारास आगीत भस्म झाले. यात महत्त्वाच्या फाईल्स, दस्तऐवजसह संगणक, प्रिंटर, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेनंतर जिल्ह्यात अपघात की घातपात याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कारण ज्या दिवशी ही घटना घडली त्याचदिवशी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांबाबत प्राप्त तक्रारींच्या चौकशीसाठी परिपूर्ण व अद्ययावत रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश पंचायत समिती रिसोडच्या वतीने देण्यात आले होते.

या तक्रारींच्या चौकशीसाठी चौकशी समितीने २५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली होती. मात्र, त्यावेळी ग्रामपंचायतीचे सचिव उपस्थित नसल्याने संबंधित रेकॉर्डची तपासणी होऊ शकली नव्हती. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी परिपूर्ण व अद्ययावत रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायतीला कळविण्यात आले होते.

दरम्यान, चौकशीसाठी रेकॉर्ड पूर्ण करण्याकरिता ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी दहा दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला कळविण्यात आले होते. चौकशीच्या अनुषंगाने १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच परिपूर्ण व अद्ययावत रेकॉर्डसह उपस्थित राहण्याचेही पत्रात नमूद करण्यात आले होते.

Gram Panchayat Fire
Maharashtra Political Live Update : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा, पोलिस अलर्ट मोडवर

पहाटे तीनच्या सुमारास आग

या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास माळेगाव नजीक किन्ही ग्रामपंचायत कार्यालयातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने संबंधितांना माहिती दिली. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत आगीने मोठे रूप धारण केले होते. या आगीत ग्रामपंचायतीतील विविध फाईल्स, दस्तऐवज, रेकॉर्ड, संगणक, प्रिंटर, पाणी टाकी, पाणी फिल्टर, फर्निचर तसेच इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ग्रामसेवक भीमेश यांच्या फिर्यादीवरून जऊळका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली की अन्य कारणामुळे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Gram Panchayat Fire
Maharashtra News Live Update : उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का, माजी आमदार हिरा ठाकुर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ग्रामपंचायतीच्या कामकाजावरून गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाल्याने ग्रामस्थांमध्ये विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मात्र, आगीचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

याबाबत गटविकास अधिकारी श्री पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com