Sanjay Gaikwad News: राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश टळला; श्वेता महालेंचे राजकीय विरोधक संजय गायकवाडांनी फोडला आरोपांचा नवा बॉम्ब

Buldhana News: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बोंद्रे यांच्यावर पक्षप्रवेशासाठी धमक्या आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून दबाव आणला जात होता,असा आरोप केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांनी टोकदार होत चाललेला गायकवाड विरुद्ध भाजप आमदार श्वेता महाले वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
Sanjay Gaikwad rahul bondre shweta mahale .jpg
Sanjay Gaikwad rahul bondre shweta mahale .jpgSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: गेल्या दोन दिवसांपासून बुलढाण्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. काँग्रेसचे चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रवेशाच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी फोनवर संवाद झाल्यानंतर बोंद्रे यांना त्यांचा निर्णय बदलण्यास भाग पाडले. बोंद्रे यांच्या यू टर्नवरुन पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशातच शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही बोंद्रे यांच्या भाजपप्रवेशावरुन धक्कादायक विधान करत नवा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी मंगळवारी (ता.22) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांच्याविषयी मोठं विधान केलं.ते म्हणाले,राहुल बोंद्रे यांचा शिवसेना प्रवेश आधी ठरला होता.एकनाथ शिंदे यांची आम्ही भेटही घेतली होती. त्याचे व्हिडीओ आणि फोटोही माझ्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं.

राहुल बोंद्रे हे आधी शिवसेनेत येणार होते,मात्र संवादाच्या अभावामुळे भाजपने त्यांच्यासाठी जोर लावला. पुढच्या काही दिवसांत त्यांचा पक्षप्रवेश होणार होता.पण शिंदेसाहेबांना दिल्लीला जायचं होतं. मला ते म्हणाले, दोन-चार दिवसांनी आपण येऊ. त्याचदरम्यान,बुलढाणा जिल्हा बँकेची निवडणूक लागली. त्यात 20-22 दिवस गेले आणि 15 दिवस कर्नाटकला गेले.त्यामुळे बोंद्रे यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेत मोठा कम्युनिकेशन गॅप पडल्याची कबुली गायकवाड यांनी यावेळी दिली.

त्यादरम्यान,भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन राहुल बोंद्रेंना फोन गेले की, तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जायचे नाही, तर आमच्याकडे या असं सांगण्यात आलं. तसेच त्यांना धमकीही देण्यात आली. त्यानंतर माझी आणि त्यांची एक बैठकही झाली. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही बैठकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जायचंय असं सांगितलं, कारण एकनाथ शिंदेंवर तमाम महाराष्ट्राचा विश्वास आहे.

Sanjay Gaikwad rahul bondre shweta mahale .jpg
Sangli DCC Bank: चंद्रकांतदादा,पडळकर, खोत अन् जयंत पाटलांची प्रतिष्ठा पणाला, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

संजय गायकवाड म्हणाले, ज्यावेळी राहुल बोंद्रेंचं एकनाथ शिंदे साहेबांकडे जायचं असं ठरलं,तेव्हा त्यांना वरुन ज्याप्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं, धमक्या देण्यात आल्या. तुझं आम्ही जगणं मुश्किल करु,तुझं हे बाहेर काढून, ते बाहेर काढू. अक्षरश:त्यांच्या नरडीवर पाय देऊन त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता असा आरोपही आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी केला.

पण काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा त्यांच्याशी फोनवरुन संवाद झाला. त्यानंतर राहुल बोंद्रे यांनी आपला भाजपप्रवेशाचा निर्णय बदलल्याचं आपण सर्वांनी पाहिलं,असंही संजय गायकवाड यांनी सांगितलं

Sanjay Gaikwad rahul bondre shweta mahale .jpg
Rajasthan Election Results: मोठी बातमी: भाजप अन् केजरीवालांच्या 'आप'ची युती; सर्वात मोठा पक्ष ठरुनही काँग्रेसवर सत्तेबाहेर राहण्याची वेळ

आमदार संजय गायकवाड यांनी बोंद्रे यांच्यावर पक्षप्रवेशासाठी धमक्या आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून दबाव आणला जात होता,असा आरोप केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांनी टोकदार होत चाललेला गायकवाड विरुद्ध भाजप आमदार श्वेता महाले वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com