Pramod Mahajan : प्रमोद महाजनांची हत्या का झाली? तब्बल 19 वर्षांनंतर भावाने उठवला पडदा : मग सारंगी महाजनांनी विषय थेट PM पदापर्यंतच नेला!

Pramod Mahajan murder News : प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून त्यांचे मोठे भाऊ प्रकाश महाजन यांनी एका मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Pramod mahajan, prakash mahjan, pravin mahajan
Pramod mahajan, prakash mahjan, pravin mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येला 19 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांची हत्या भाऊ प्रवीण महाजन यांनी केली. ही हत्या का करण्यात आली. त्या हत्या प्रकरणाबद्दल आजही वेगवेगळी कारणे सांगितली जातात. मात्र, नेमके कारण पुढे आलेले नाही. मात्र, प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून त्यांचे मोठे भाऊ प्रकाश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रमोद महाजन यांची हत्या ही फक्त पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरातून झाली. प्रवीण महाजन हा केवळ पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता, असा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे प्रकाश महाजन यांनी केलेला ब्लॅकमेलचा आरोप फेटाळून लावताना सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली.

प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांना केवळ पैशासाठी ब्लॅकमेल केले जात होते. प्रवीण महाजनने भावाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. प्रमोद राक्षस असला तरी त्याला गोळ्या घालायचा अधिकार कोण दिला? केवळ पैशांसाठी, लोभासाठी, आणि स्वार्थासाठी हा खून झाला. ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती आहे. प्रवीणने केवळ पैसा लोभ आणि स्वार्थासाठी खून केला. प्रवीण स्वतः काही काम करत नव्हता. नोकरीला जायचे नाही, कंपनीकडून पगार वाढ मागायचा, पैसे मागायचे एवढाच त्यांचा उद्योग होता, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला.

Pramod mahajan, prakash mahjan, pravin mahajan
Raju Shetti :...तरच मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतचे गैरसमज दूर होतील', राजू शेट्टी जैन बोर्डिंगवरून पुन्हा भिडणार

सारंगी महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसावरून पंकजा मुंडे यांच्यावर बोचरी टीका करताना बिघडलेली मुलगी असा उल्लेख केला होता. धनंजय मुंडे यांच्यावरही तोफ डागली होती. यानंतर आता प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर सडकून प्रहार करत त्यांना भूतकाळाची आठवण करून देत लाज वाटत नाही का? अशीही विचारणाही प्रकाश महाजन यांनी केली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती. त्या क्षणापासून एक वैर पेटले असल्याचे त्यांनी सांगितले.

Pramod mahajan, prakash mahjan, pravin mahajan
Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का, महत्वाचा बडा नेता लागला भाजपच्या गळाला

गोपीनाथ मुंडे यांनी सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावर विश्वास ठेवून जमीन घेतली होती. आज त्याच जमिनीवरून केस करून पंकजा मुंडेवर डाग लावले जात आहेत. केवळ ‘महाजन’ हे आडनाव असल्यामुळे लोक गप्प आहेत, पण जर धनंजय आणि पंकजांनी आवाज उठवला, तर उद्या वकीलसुद्धा त्यांना मिळणं कठीण होईल, असेही प्रकाश महाजन म्हणाले.

Pramod mahajan, prakash mahjan, pravin mahajan
Jain Boarding Land Deal : जैन बोर्डिंग प्रकरणात मोठी अपडेट, बिल्डर गोखलेंची माघार; व्यवहार रद्द!

मुलाची बदनाम करताना लाज वाटत नाही का ?

तुम्हाला गोपीनाथ मुंडेंचा फोन गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळतो, तुम्हाला प्रमोद महाजनने सांगितल्यावर अमेरिकेचा व्हिसा मिळतो, त्यावेळी तुम्हाला प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे चालत होते, त्यांच्या मुलाची बदनाम करताना थोडी सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही का? अशीही विचारणा त्यांनी सारंगी महाजन यांना केली. तुमचा नवरा काही काम करत नव्हता, तरीही फोंडा सारखा वकील तुम्हाला कसा परवडला? गावोगावी पुस्तके घेऊन फिरता आणि इतरांच्या चरित्रावर चिखलफेक करता. ज्याची लाज वाटली पाहिजे, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

Pramod mahajan, prakash mahjan, pravin mahajan
Pune Jain Boarding House Land: जैन बोर्डिंगचा जमिन व्यवहार रद्द झाल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

माझ्या पतीने कधीच प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल केले नाही, मुंडेंच्या घरातील कोणीतरी प्रकाश महाजनांना बोलायला सांगत आहे. प्रवीण महाजन हे प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करत होते, त्यांची हत्या पैशांच्या हव्यासातून झाली आहे, हा प्रकाश महाजनांचा आरोप खोटा आहे. आम्ही प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल करत असतो तर आज आम्ही सी-फेसला बंगला घेऊन राहिलो असतो. त्यामुळे प्रमोद महाजनांची हत्या ही पैशांसाठी झालेली नाही, असे सारंगी महाजन म्हणाल्या.

Pramod mahajan, prakash mahjan, pravin mahajan
Pune Politics : पुण्यात अजितदादांनीही फिल्डिंग लावली, भाजपला रोखण्यासाठी आमदारांना लावलं कामाला

प्रमोद महाजनांना आमच्या घरातले निस्तरता आले नाही : सारंगी महाजन

महाजन परिवारातील लढाई ही मानपमानाची आहे. प्रवीण महाजन यांचा अपमान व्हायचा. महाजन भाऊ-बहिणींची पैसेवाले आणि पैसे नसणारे अशी विभागाणी झाली होती. अनेकजण म्हणतात, आज प्रमोद महाजन असते तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते. पण माझा सवाल हा आहे की, आमच्या घरातलं त्यांना निस्तरता आले नाही, ते घराला सावरु शकले नाहीत, ते देशाला कसे सांभाळू शकले असते? त्यांनी घराला कुठे सावरलं? प्रकाश महाजन माझ्याकडे केस लढवण्यासाठी महागडा वकील नेमण्यासाठी पैसा कुठून आला, असा प्रश्न विचारतात. पण तो पैसा तुमच्या घरातील नव्हता, तो माझ्या माहेरुन आला होता. आम्ही परदेशात फिरलो ते स्वत:च्या पैशांनी फिरलो, असेही सारंगी महाजन यांनी स्पष्ट केले.

Pramod mahajan, prakash mahjan, pravin mahajan
NCP candidate announcement : अजितदादांची आघाडी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com