ZP Reservation : बीड, नांदेड, पालघरसह रखडलेल्या 20 जिल्हा परिषद निवडणूका कधी? आरक्षणाच्या याचिकेवरही निर्णय

Supreme Court SC-ST Rotation : राज्यातील 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यातच आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत कोर्टाने निर्देश दिले आहेत.
Palghar ZP
Palghar ZPsarkarnama
Published on: 
Updated on: 

Supreme Court : राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्या घेण्याचे निर्देश कोर्टाने पूर्वीच दिले आहेत. ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, आता एससी-एसटीसाठी विशिष्ट मतदारसंघ आरक्षीत करण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत कोर्टाने आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नियम 2025 मधील नियम 12 ला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली.

या सुनावणीत मतदार तसेच उमेदवाराला विशिष्ट मतदारसंघ आरक्षित करून घेण्याचा कोणताही हक्क नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. जागांचे रोटेशन त्यांच्या मागणीनुसार होणार नसल्याचे स्पष्ट केले.

जागांच्या रोटेशनची पद्धत आणि कालमर्यादा ठरवणे सरकारच्या अधिकारक्षेत्रात येते, असे सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

जानेवारी महिन्यात 12 जिल्हा परिषद तसेच 125 पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र, 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामध्ये कोकण विभागातील पालघर, ठाणे यांचा समावेश आहे.

तसेच अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्हा परिषदांची निवडणुका देखील रखडल्या आहेत.

Palghar ZP
Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाची कराडला लॉटरी..? ZP अध्यक्ष निवडीवेळची कटुता संपवणार की पुन्हा सत्तासंघर्ष..?

पुढील वर्षीच निवडणुकांचा बार

20 जिल्हा परिषदेसोबत 211 पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने त्या घेण्याची परवानी दिली आहे. मात्र, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमी, एसआयआर, जनगणना आदी कारणामुळे या निवडणुका यंदा होणार नसल्याचे स्पष्ट आहे. पुढील वर्षीच या निवडणुकांचे बार उडणार आहेत.

Palghar ZP
Supreme Court news : ZP, पंचायत समित्यांसाठी महत्वाची बातमी; मतदारसंघ आरक्षणाच्या रोटेशनवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब, सरकारला दिलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.