Mumbai News, 20 News : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीमुळे आता राणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावर (Kudal-Malvan Constituency) दावा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे ते शिवसेनेत (Shivsena) पक्ष प्रवेश करणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून निलेश राणे हे कोकणातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती.
शिवाय यासाठी त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांशी खलबतं देखील सुरू ठेवली होती. अशातच रविवारी (ता. 20) ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे त्यांचा या मतदारसंघातून लढण्याचा दावा पक्का असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपापल्या हक्काच्या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडून येऊ शकेल असा उमेदवार देण्याचं सूत्र ठरलं आहे. अशातच आता कोकणात राजकीय दबदबा असलेल्या राणे कुटुंबीयांनी कुडाळ-मालवण विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळत आहे.
निलेश राणे (Nilesh Rane) हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी जर हा पक्ष प्रवेश केला तर त्यांची उमेदवारी फिक्स असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोकणात महायुतीत मोठी घडामोड होण्याची शक्यता असून राणेंना ही जागा शिंदे देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.