Shivsena Symbol : शिंदे गटाला शिवसेना मिळाल्यानंतर फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Devendra Fadnavis : ''आम्ही पहिल्यापासून सांगत होतो खरी शिवसेना ही शिंदेची आहे..''
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra fadnavis on Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ''एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदे हे पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत. खरी शिवसेना (Shivsena) ही शिंदे यांचीच आहे. राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो'', अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis
Shiv Sena Symbol : धनुष्यबाण गमावल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया : म्हणाले, "खोक्यांचा विजय.."

''आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. खरी शिवसेना ही शिंदेची आहे. शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचे काम शिंदे करत आहेत'', असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Congress : के.सी. वेणुगोपाल हे पटोलेंच्या खिशात, डाॅ.आशिष देशमुखांचा खळबळजनक आरोप !

दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. तसेच यावर अद्याप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. त्यामुळे ते नेमकं यावर काय भूमीका मांडणार? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Devendra Fadnavis
Chinchwad By-Election : भाजपचं टेन्शन वाढणार; महेश लांडगेंच्या ट्विटर पोलमध्ये राष्ट्रवादीच्या काटेंना पसंती

दरम्यान, शिंदेंनी 40 आमदारांना घेऊन बंड केले होते. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून याबाबत निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. यानंतर आज आयोगाने निर्णय दिला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com