Thane Politics : आव्हाडांना दणका देत शिंदेंनी वाढवली मुलाची ताकद; लोकसभेला श्रीकांत शिंदेंचं 'कल्याण' होणार!

Thane Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का दिला.
7 ex-corporators from Kalwa-Mumbra joined Shiv Sena in Eknath Shinde’s presence, boosting Shrikant Shinde’s political influence in Kalyan.
7 ex-corporators from Kalwa-Mumbra joined Shiv Sena in Eknath Shinde’s presence, boosting Shrikant Shinde’s political influence in Kalyan.Sarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जोरदार धक्का दिला. मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 7 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात आव्हाड यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी समजल्या जाणाऱ्या मिलिंद पाटील समावेश होता. शिंदे यांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकने आव्हाड यांचे बालेकिल्ल्यातच मोठे नुकसान केले आहे.

या सर्जिकल स्ट्राईकने शिंदे यांनी ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेची ताकद वाढवली आहे. 2017 च्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. तर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आले होते. या सर्वाधिक नगरसेवक मुंब्रा-कळवा या भागातून निवडून आले होते. राष्ट्रवादी विभागल्यानंतर 34 पैकी जवळपास 24 नगरसेवक शिवसेना किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे आव्हाड यांच्यासोबत अवघे 10 नगरसेवक बाकी राहिले.

7 ex-corporators from Kalwa-Mumbra joined Shiv Sena in Eknath Shinde’s presence, boosting Shrikant Shinde’s political influence in Kalyan.
Thane Politics : शिंदेंनी जोशात येऊन आव्हाड यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला... पण, स्वत:च घर सावरायला विसरले!

यातही कळवा भागात राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक होते. यामध्ये एका अपक्ष नगरसेवकाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता, तर एक माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नऊ माजी नगरसेवक राहिले होते. अशात या नव्या 7 जणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांची वजाबाकी पाहिल्यास आता केवळ दोनच शिलेदार उरले आहेत. त्यांनाही गोटात घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

या खेळीतून एकनाथ शिंदे यांनी मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे भविष्य सेफ केल्याचे दिसून येते. मिशन कळवामुळे शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला मजबुती मिळणार आहे. 2024 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे कळवा-मुंब्रा मतदारसंघातून जवळपास 65 हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर-राणे या अत्यंत नवख्या उमेदवार असूनही शिंदे यांना इथे मत मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

7 ex-corporators from Kalwa-Mumbra joined Shiv Sena in Eknath Shinde’s presence, boosting Shrikant Shinde’s political influence in Kalyan.
Thane Politics : आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा 'सर्जिकल स्ट्राईक' : राष्ट्रवादीला जवळपास रिकामचं केलं!

दरेकर यांना इथे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या याच माजी नगरसेवकांची मोठी मदत झाली होती. आव्हाडांच्या रणनीतीपुढे कळवा, मुंब्रांमध्ये शिंदे यांना आघाडी मिळवता आली नव्हती. पण आता शिंदे यांनी याच भागातील माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचत श्रीकांत शिंदे यांच्या मागील ताकद वाढवली आहे. त्यामुळे आगामी काळातील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा परिसर यानिमित्ताने बांधण्यात आल्याचे दिसून येते. आज घडीला संपूर्ण ठाण्यात 85 हून अधिक माजी नगरसेवकांची कुमक त्यांच्या गाठीला आजच्या घडीला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com