ठाणे लोकसभेच्या ( Thane Lok Sabha Election 2024 ) जागेसाठी महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. या जागेसाठी भाजपकडून संजय केळकर आणि शिवसेनेकडून चार जण इच्छुक होते. पण, अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचे शिलेदार माजी महापौर नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच, श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांच्या नावाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मंगळवारी, 30 एप्रिलला रात्री शिवसेनेकडून इच्छुक असणारे माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) व माजी आमदार रवींद्र फाटक या चौघांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील खासगी निवासस्थानी बैठक पार पडली. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व इच्छुकांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी 'वन टू वन' चौघांशी चर्चा केली. चौघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याचं मंगळवारी रात्रीच स्पष्ट झालं होतं. अखेर आज, बुधवारी नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. म्हस्के यांची विद्यमान खासदार राजन विचारे ( Rajan Vichare ) यांच्याशी थेट लढत होणार आहे.
नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. म्हस्के हे अनेक वर्षापासून ठाण्यात नगरसेवक आणि महापौरही होते. शिवसेनेत बंड झाल्यापासून म्हस्के एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे एकनिष्ठ राहिल्याचं फळ एकनाथ शिंदे यांनी म्हस्केंना दिलं आहे.
कल्याणमध्ये दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे लढत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती. पण, शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी आज जाहीर करण्यात आली आहे. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटानं वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, नावाची घोषणा होण्यापूर्वीपासून श्रीकांत शिंदे प्रचाराला लागले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.