Shrikant Shinde News : " बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातून काँग्रेसला गाडण्याचे विचार दिले, तर उद्धव ठाकरे..."

Shivsena Political News : " उद्धव ठाकरे हे कवळ मालमत्तेचे वारसदार आहेत..."
Shrikant Shinde- Uddhav Thackeray
Shrikant Shinde- Uddhav Thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

राहुल क्षीरसागर

Thane News : बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून काँग्रेसला गाडण्याचे विचार दिले होते, पण आता उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातून हिंदुत्वाचे विचार बाजूला पडले असून, केवळ काँग्रेस कशी वाढेल, यासाठीच प्रयत्न केले जात असल्याचा आरोप खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.

त्यामुळे उद्धव ठाकरे हे केवळ मालमत्तेचे वारसदार असून, हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी करत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.

ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबतच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केदेखील उपस्थित होते.

Shrikant Shinde- Uddhav Thackeray
Fadanvis On Congress-Shivsena : ‘मोहब्बत की दुकान’ बंद पडली म्हणत फडणवीसांनी कॉंग्रेससह शिवसेनेलाही धुऊन काढले !

शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्यात हिंदुत्वाचे विचार देत होते. याच विचारांचे सोने लुटण्यासाठी सर्वजण एकत्र येत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्यातून काँग्रेसला गाडण्याचे विचार दिले होते. परंतु,आता हिंदुत्वाचे विचार बाजूला पडले असून, केवळ काँग्रेस कशी वाढेल, यासाठीच प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे...

खासदार शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे कवळ मालमत्तेचे वारसदार आहेत. मात्र, हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मागील दीड वर्षापासून राज्य सरकारने सर्वच निर्बंध दूर केले आहेत. संजय राऊत यांच्याबद्दल ते म्हणाले, काही लोकांवर बोलायला मला आवडत नाही.

दरम्यान, नरेश म्हस्के यांनी संजय राऊत हे भंगार मनोवृत्तीचे असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच त्यांनी पक्षाला भंगारात नेण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोदामात भंगार बनवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिक येथे शिवसेनेच्या वतीने ड्रगमाफियाच्या विरोधात कारवाई व्हावी, या उद्देशाने मोर्चा काढण्यात येणार आहे, याबाबत विचारले असता, केवळ सहानुभूती मिळविण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

...म्हणूनच विधानसभा अध्यक्षांना उशीर !

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील. त्यांनादेखील विविध प्रकारचे कागदपत्र तपासावे लागत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत आहे. मात्र, न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष हे आता लवकरच शेड्यूल देतील, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Shrikant Shinde- Uddhav Thackeray
Ahmednagar Politics : नगरमध्ये येणार तेलंगणातील भाजप आमदार; टी. राजासिंहांच्या सभेसाठी परवानगी अर्जच नाही

निवडणूक आयोगाने यापूर्वी खरी शिवसेना आम्ही आहोत, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्हीदेखील आता अध्यक्षांकडून निर्णयाची वाट बघत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Shrikant Shinde- Uddhav Thackeray
Praful Patel News : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या याचिकेवर एकत्र सुनावणी ? प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.