Mumbai APMC : भाजपच्या मंत्र्याच्या आदेशाने राष्ट्रवादी अन् शिवसेनेची गोची : तब्बल 50 हजार कोटींच्या उलाढालीची लावली चौकशी

Mumbai APMC : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर जयकुमार रावल यांनी 2020 ते 2025 मधील 50 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारांची चौकशी सुरू केली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge of Mumbai APMC's high-level board and announces an inquiry into financial transactions from the previous administration.
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge of Mumbai APMC's high-level board and announces an inquiry into financial transactions from the previous administration.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai APMC : आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता 'राष्ट्रीय बाजार'चा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. या बाजारपेठेचे नियंत्रण आणि व्यवस्थापन उच्चस्तरीय बोर्डाच्या हाती गेले असून पणनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकताच अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच रावल यांनी मागील संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई बाजार समितीची वार्षिक उलाढाल 10 हजार कोटींच्या घरात आहे. 2020 ते 2025 या दरम्यान, झालेल्या एकूण 50 हजार कोटींच्या उलाढालीची चौकशी होणार आहे.

पणन मंत्र्यांच्या आदेशानंतर पणन संचालक शरद जरे यांनी या चौकशीचे आदेश काढले आहेत. यानुसार, उत्पन्न-खर्च, निविदा प्रक्रिया, बांधकामे, कंत्राटे तसेच अन्य आर्थिक व्यवहार अशा तब्बल 20 मुद्द्यांची तपासणी होणार आहे. पणन मंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अन् काँग्रेसची गोची झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अन् शिवसेनेची गोची :

मार्च 2020 मध्ये बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यात 18 पैकी 16 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. अगदी नागपूरसारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यातही महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली.

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge of Mumbai APMC's high-level board and announces an inquiry into financial transactions from the previous administration.
Mumbai APMC : मुंबई बाजार समितीचे संचालक मंडळ तडकाफडकी बरखास्त; मंत्री जयकुमार रावल 'बॉस'!

निकालानंतर, महाविकास आघाडीच्या सत्तावाटप सूत्रानुसार औरंगाबाद विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक अशोक डक यांच्याकडे सभापतीपदाची तर पुणे विभागातील काँग्रेसचे नेते धनंजय वाडकर यांच्याकडे उपसभापतीपदाची सुत्रे सोपवण्यात आली. या निवडीमुळे बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित झाले.

2022 मधील सत्तांतरानंतर पुढील काही महिन्यातच महायुतीने संख्याबळ जुळवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रभू पाटील हे सभापतीपदी विराजमान झाले. 31 ऑगस्ट 2025 रोजी पाच वर्षांचा अधिकृत कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर निवडणुका घेणे तांत्रिक कारणांमुळे शक्य नसल्याने पणन संचालक विकास रसाळ यांची बाजार समितीवर मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge of Mumbai APMC's high-level board and announces an inquiry into financial transactions from the previous administration.
Mumbai APMC : मुंबईतील ​10 हजार कोटींच्या साम्राज्यावर भाजप मंत्र्यांचा सर्जिकल स्ट्राईक; फिल्डिंग लावण्यासाठी बुके घेऊन गेलेल्या नेत्यांची गोची!

मागील काही दिवसांपासून एपीएमसीच्या कामकाजाबाबत व्यापारी, माथाडी कामगार आणि इतर घटकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. बाजार समितीच्या मालकीच्या जागांचा वापर, भाडेपट्टे, बांधकाम परवानग्या, निविदा प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित होत होते. याच तक्रारींच्या अनुषंगाने पणन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com