Mumbai News : महापालिका निवडणुकीचा निकाल लागून15 दिवसापेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही मुंबई महापालिकेत घडामोडीना वेग आलेला दिसत नाही. गेल्या दोन दिवसापासून पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काठावरचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर पदासाठी रस्सीखेच दिसून येत आहे.
त्यातच स्थायी समितीच्या सदस्य संख्याबळ 13-13 असे सत्ताधारी व विरोधकांचे समसमानअसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत स्थायी समितीसाठी रस्सीखेच सुरु असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला याचा फटका बसणार आहे. अन्य पक्षीय नगरसेवकांच्या पाठिंब्यासाठी भाजप-शिंदेसेना प्रयत्नशील असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे वैधानिक समित्यांवरील बहुमत डळमळीत झाले आहे. यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून अन्य पक्षांतील नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा पाठिंबा मिळाल्यास स्थायी समितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांचा एक सदस्य कमी होऊन सत्ताधारी पक्षाचा एक सदस्य वाढवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
त्यातच आता भाजप-एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकानी सोमवारी शक्तिप्रदर्शन करत एकत्र गट नोंदणीसाठी मुंबईहून नवी मुंबईतील कोकण आयुक्त कार्यालयात गेले. त्यानंतर आता महापौरपदाच्या निवड प्रक्रियेला वेग आला आहे. दोन्ही पक्षांनी सोमवारी गटनेत्याची निवड करीत बाजी मारली आहे. त्यामुळे आता 11फेब्रुवारीला होत असलेल्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 89, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65, काँग्रेस 24, एमआयएम आठ आणि मनसेला सहा जागा मिळाल्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नगरसेवक पालिकेत निवडून आला आहे.
मुंबई महापालिकेतील पक्षाची आकडेवारी लक्षात घेतली तर स्थायी समितीत 27 सदस्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील भाजपचे 10, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन तर विरोधी पक्षातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आठ, काँग्रेसचे तीन तसेच एमआयएम आणि मनसेचे प्रत्येकी एक सदस्य असणार आहे. सत्ताधारी-विरोधक 13-13 सदस्य आणि एक शिक्षण समिती अध्यक्ष पदसिद्ध सभापती असणार आहे, हे गणित पालिका अधिकाऱ्यांकडून मांडले जात आहे.
समसमान सदस्य संख्येमुळे भविष्यात महत्त्वाच्या प्रस्तावाच्यावेळी सत्ताधाऱ्यांची अडचण होऊ शकते. त्यामुळेच सत्ताधारी सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी आता प्रयत्न होऊ लागले आहेत. विरोधी पक्षातील दोन-तीन नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दर्शवला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक सदस्य कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अन्य पक्षांशी आघाडीचा प्रयत्न केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.