

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत काहीच कल्पना नव्हती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये लातूर आणि सांगली वगळता जवळपास सगळ्याच इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांचे कुटुंबीय सुद्धा घड्याळाचे चिन्ह घेऊन लढले आहेत. त्यावेळी घड्याळ चिन्हावर हे उमेदवार लढले होते. त्यांना एबी फॉर्म कोणी दिले. त्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी कोणाची आहे, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी विलिनीकरणाबाबत साम टीव्हीला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे केले आहेत. विलिनीकरणाच्या बैठकीला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नव्हते का? यावर अमोल कोल्हे यांनी सांगितले की, 'हा प्रश्न त्यांना विचारणं जास्त संयुक्तिक आहे. कारण यातील काही उपप्रश्न येतात, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांचे कुटुंबीय या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अशोक बापू पवारांच्या पत्नी सुजाता पाटील, हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढले. तर या सर्वांना एबी फॉर्म कुणी दिले. आम्हाला कल्पना नाही, असे प्रदेशाध्यक्ष म्हणत असतील तर त्यांनी याचेही उत्तर द्यावे की एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्षांची सही असते. या नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे पक्षात अधिकृत प्रवेश झालेले नाही मग एबी फॉर्म कसे दिले. मग एबी फॉर्म देताना प्रदेशाध्यक्षांनी प्रश्न विचारला नसेल का? असे कोडे लोकांना पडते, असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमदेवाराला जुन्नर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची मते होती. अजित पवारांच्या पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. सगळेच्या सगळे उमेदवार जर घड्याळाचा चिन्हावर लढत असतील मग हे कोडे पडले नसेल का. जर मग कुणी म्हणते या गोष्टीची कल्पना नाही यावर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा हा सुद्धा मोठा प्रश्न यातून तयार होतो, असेही यावेळी कोल्हे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात हे जे काही टप्पे घडले आहेत. त्यामध्ये नेतेमंडळीमध्ये एकूण 14 बैठका झाल्या आहेत. यातील 11 बैठका जयंत पाटील यांच्या घरी झाल्या होत्या. याबाबत जयंत पाटील यांनी देखील सांगितले आहे. ही सगळी वस्तुस्थिती असल्याचे खासदार कोल्हे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.