

NCP Crisis In Maharashtra And Central Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (दि.२ जुलै) मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह मोठा गट त्यांच्यासोबत आहेत. ज्यांना राष्ट्रवादीचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते म्हटले जात होते त्यांनीच पक्षाची साथ सोडली. हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. (Latest Political News)
अजित पवार यांच्याबाबत गेलेल्यांमध्ये दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे बडे नेते गेले आहेत. यातील वळसे पाटील, तटकरेंची मुलगी आदिती, भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल यांची निवड करण्यात आली होती. त्यांना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्या नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात नव्या मित्र पक्षाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदी खासदार प्रफुल पटेल यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी रविवारी (ता. २) भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सहभाग घेतला आहे. त्यानंतर केंद्रातही बदलाच्या हालचाली सुरू आहेत. यात खासदार प्रफुल पटेल यांना विस्तारत कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, आज सोमवारी (ता. ३) मिनिस्टर ऑफ कौन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी बंडाबाबत शरद पवारांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. राज ठाकरे म्हणाले, "बंडात अजित पवार यांना दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी साथ दिली आहे. हे नेते पवार यांनी सांगितल्याशिवाय असे करतील, असे वाटत नाही. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले तर मला कसलेही आश्चर्य वाटणार नाही. राज्यातील राजकारण दिवसेंदिवस गलीच्छ होत चालले आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.