Mumbai News, 26 July : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उद्या (ता. 27 जुलै) रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ठाकरे यांना त्यांचे कट्टर विरोधक भाजप नेते नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्रिपदाच्या उल्लेखावरून त्यांनी टोला देखील लगावला आहे.
अशातच आता भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या भावी मुख्यमंत्रिपदाच्या बॅनरबाजीवर भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो, पण बॅनर लावून कोणी भावी मुख्यमंत्री होत नाही, ते जनता आणि मतदार ठरवत असतात, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात शिवसैकांकडून बॅनर लावण्यात आले आहेत.
यातील अनेक बॅनरवर ठाकरे यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख केला आहे. याच भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबाजीवर बोलताना प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, "आपण वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देत असतो. या दिवशी वाईट चिंतत नाही, वाईट बोलत नाही. त्यामुळे ठाकरेंना मी मनापासून शुभेच्छा देतो.
मात्र, बॅनर लावून कोणी भावी मुख्यमंत्री होत नाही, ते जनता आणि मतदार ठरवत असतात. तसंच उद्धव ठाकरेंना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून सर्वसामान्यांची सेवा होवो आणि बाळासाहेबांचं बाळकडू पुढे नेण्याची त्यांना शक्ती मिळो," अशा शब्दात दरेकर यांनी ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी त्यांनी ठाकरेंना टोला देखील लगावला. राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. देव तुम्हाला चांगलं बोलण्याची बुद्धी देवो. भावीला काही अर्थ नाही, भावीच राहतो. उद्धव ठाकरेच्या पक्षाला गळती लागली आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.