Sanjay Raut News : शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास फडणवीस, अजित पवार, तटकरे, वळसेंचा विरोध; राऊतांचा खळबळजनक दावा..

Lok Sabha Election 2024 : आम्ही ज्युनिअर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, अशी यांची भूमिका होती, असेही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Latest News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. 2019 च्या आधी भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्रपदी नको होते. खुद्द देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी ही भूमिका मांडली होती. एवढेच नाही तर ऑक्टोबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनताना अजिज पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांनी देखील शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवण्यास विरोध केला होता. शिंदे हे आम्हाला ज्युनिअर आहेत, आम्ही त्यांच्या सोबत काम करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांची होती, असे राऊत यांनी दावा केला आहे. (Lok Sabha Election 2024)

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासह ठाणे आणि कल्याण येथेही मतदान पार पडत आहे. ठाणे आणि कल्याण हे मुख्यत: एकनाथ शिंदे यांचं प्रभावक्षेत्र आहे. या ठिकाणच्या मतदानाच्या एक दिवस आधी असं वक्तव्य करणं, हे संजय राऊत यांनी ठरवून केलं का? अशी चर्चा आता होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut News
Kolhapur Shivsena : ...म्हणून आता कोल्हापुरातील ठाकरे-शिंदे गटाच्या निष्ठावंतांचा मुंबईत ठिय्या!

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा गौप्यस्फोट केला आहे. "तेव्हाही शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती. शिवसैनिकांकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं. पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की, दिल्लीचा मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय काय येईल, याची माहिती नाही. पण आम्हाल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत. हे फडणवीसांपासून सर्वच भाजप नेत्यांची भूमिका होती," असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

Sanjay Raut News
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !
Sanjay Raut News
BJP Political Analysis : उत्तर महाराष्ट्रातील वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा यंदा प्रखर संघर्ष

ऑक्टोबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, हे सांगणारे सर्वात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळस पाटील होते.आम्ही वरिष्ठ आहोत. आम्ही ज्युनिअर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, अशी यांची भूमिका होती, असेही संजय राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com