MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्षांसमोर गुरुवारी सुनावणी

Shivsena MLA Disqualification News : आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांनी गेल्या सुनावणीवेळी कागदपत्र सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.
Eknath Shinde,Rahul Narvekar, Uddhav Thackeray
Eknath Shinde,Rahul Narvekar, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी गुरुवारी दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार आहे. या सुनावणीत आता वेगवेगळ्या याचिकांची वर्गवारी करण्यात आली आहे. 34 याचिका आता सहा गटांत मांडल्या जाणार असून, यावर सुनावणी होणार आहे.

आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांनी गेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. तसेच 34 याचिकांचा समावेश सहा याचिकांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पुन्हा अर्ज करण्यात आले होते, त्यावर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.

Eknath Shinde,Rahul Narvekar, Uddhav Thackeray
Mla Disqualification Case : अर्जामागून अर्ज; नार्वेकरांनी ठाकरे गटाला फटकारले, शिंदे गटाला मात्र मुदतवाढ

तसेच तुम्ही अर्जामागून अर्ज देता. त्यामुळे ही प्रक्रिया लांबू शकते, अशा शब्दांत ठाकरे गटाला नार्वेकरांनी फटकारले होते. या बरोबरच सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशी सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला केली होती.

दरम्यान, आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये नार्वेकरांवर दिरंगाईसंदर्भातील याचिकेवरील मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. तसेच विधानसभा अध्यक्षांनी नियोजित केलेले वेळापत्रक मान्य नसल्याचे सांगत पुन्हा सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आता सुधारित वेळापत्रक सादर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत येत्या सुनावणीवेळी आणखी काय घडामोडी घडतात, याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

शिंदे-फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर...

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडामोडी वेगाने घडत आहेत, तर शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राहुल नार्वेकरांचे अचानक दिल्ली दौरे वाढल्याचे पाहायला मिळाले.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे ते दिल्लीत कुणाच्या भेटीगाठी घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Eknath Shinde,Rahul Narvekar, Uddhav Thackeray
MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत तारीख अन् वेळ ठरली; एकाच दिवशी होणार सुनावणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com