Pimpri Chinchwad News : एका सल्ल्यासाठी श्रीमंत पिंपरी महापालिका मोजणार तब्बल आठ कोटी रुपये; राष्ट्रवादीने केला कडाडून विरोध!

Pimpri Chinchwad Corporation News : "पिंपरी चिंचवडकरांच्या कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला.." राष्ट्रवादीचा आरोप...
Pimpri Chinchwad News :
Pimpri Chinchwad News :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पिंपरी-चिंचवड महापालिकेने चारशे कोटी रुपये खर्चून शहरात मोशी येथे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शहराच्या सीमेपासून अवघ्या पाच किलोमीटरवरच गहूंजे (ता. मावळ, जि. पुणे) येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असल्याने या दुसऱ्या स्टेडियमचा घाट आणि त्यावर चारशे कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशासाठी? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसने आज केली. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad News :
Uddhav Thackeray News: ''मोदी-शाहांच्या भाजपचा कर्नाटकमधील पराभव हा देशासाठी शुभशकुन...''; ठाकरे गटाचा तिखट वार...

शहरालगत गहुंजे येथे स्टेडियम असताना नव्याने ४०० कोटींची उधळपट्टी त्यावर कशासाठी, अशी विचारणा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी आज केली. प्रशासनाला हाताशी धरून खोके सरकारच्या पदाधिकाऱ्यांकडून जनतेचा पैसा लुटण्याचा हा डाव असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच हा प्रकल्प रद्द करा, अन्यथा पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवडकरांच्या कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा प्रश्न त्यांनी विचारला. दरम्यान भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघात मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या या स्टेडियमसाठी पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी ओम टेक्‍नॉलिक्‍स या सल्लागाराची काल नियुक्ती केली. स्थायी समितीने या सल्लागार कंपनीला प्रकल्पाच्या दोन टक्के सल्लागार फी देण्यास काल मंजुरी दिली.

Pimpri Chinchwad News :
Devendra Fadnavis Vs Sharad Pawar : फडणवीसांचा पवारांवर पुन्हा तिखट वार ; म्हणाले,'' ...त्यांनी तयार केलेलं सरकार मुत्सद्देगिरी आणि शिंदेंची गद्दारी ?

पुणे जिल्ह्यात पुणे शहर, गहुंजे व बारामती असे तीन क्रिकेट स्टेडियम असताना चौथे स्टेडियम बांधण्याचा घाट कोणाच्या सांगण्यावरून आणि का घातला जात आहे? अशी विचारणा काटे यांनी केली आहे. यामागे राज्यातील खोके सरकार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी असल्याचा आरोप त्यांनी केला. ते आर्थिक तडजोडी करून प्रशासनाला हाताशी धरून, शहरातील जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

तसेच, सल्लागारासाठी कोट्यावधीची उधळपट्टी होत असल्याने क्रिकेट स्टेडियमचा घातलेला घाट तात्काळ रद्द करा, अन्यथा पक्ष जनआंदोलन उभा करू, असा इशारा काटे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.