Dada Bhuse : निकाल अवघ्या काही तासांत... उत्कंठा शिगेला...

Shiv Sena MLA Disqualification case : दादा भुसेंचा निकालाबाबत मोठा दावा
Eknath Shinde, Dada Bhuse, Rahul Narwekar
Eknath Shinde, Dada Bhuse, Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव

Nashik Political News : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. काही तासांतच १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लागणार आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आपण कायद्याच्या चौकटीत काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Eknath Shinde, Dada Bhuse, Rahul Narwekar
Rahul Narwekar : आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वीच नार्वेकरांचं मोठं विधान : म्हणाले, 'मी कुणाच्याही दबावाला...'

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल उद्या (१० जानेवारी) लागणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या बुधवारी निकालाचे वाचन करतील. तत्पूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. न्यायमूर्ती आरोपीला भेटले, असा आरोप त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर आपला न्यायदेवतेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली आहे. अपात्रता प्रकरणी कायद्याच्या चौकटीत काम झाल्याचा दावाही त्यांमनी केला आहे. जून २०२२ पासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होते. त्यानंतर मे २०२३ पासून हे प्रकरण विधानसभा अध्यक्षाच्या कक्षेत आले. तेव्हापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जवळपास दीड वर्षानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागणार आहे. या निकालाकडे मैलाचा दगड म्हणून पाहिले जाणार आहे. शिवाय या निकालाचे दूरगामी परिणाम देशातील राजकारणावर होणार आहेत.

या बद्दल बोलताना ठाकरेंवर टीका टाळत दादा भुसे यांनी न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट केले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सुरू झालेली चौकशी विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत पूर्ण केल्याचाही दावा केला.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) देणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना राहुल नार्वेकरांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून याबाबत सुप्रीम कोर्टाला माहिती दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्याच्या निकालाची सर्वांची उत्कंठा प्रचंड ताणली गेली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde, Dada Bhuse, Rahul Narwekar
Shivsena MLA Disqualification : शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच; अनिल देसाईंनी सांगितले कारण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com