Bacchu Kadu: बच्चू कडू पत्रकारांवर संतापले! म्हणाले, हलका कार्यकर्ता म्हणून मला प्रश्न विचारता मग ते...

उद्धव ठाकरेंना देखील बच्चू कडूंनी धारेवर धरलं आणि प्रश्न केला की, तुम्ही आधी मुख्यमंत्री झालात की मी आधी मंत्री झालो हे आठवावं.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून आयोजित रोगनिदान शिबिराला भेट देण्यासाठी आज शिवसेना आमदार बच्चू कडू हे पुणे दौऱ्यावर होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांची संवाद साधताना त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेशाबाबत प्रश्न केला असता ते संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी थेट स्वतःची तुलना इतर नेत्यांशी केली आणि म्हणाले, मी हलका कार्यकर्ता असल्यानं तुम्ही मला प्रश्न विचारता पण त्यांना विचारत नाहीत.

Bachchu Kadu
Abhijeet Dipke: “माझा चेहराही दाखवतो आता”; अभिजीत दिपकेला धमकी देणारा तरुण आला समोर, २३ तास झाले पण पोलिसांना सापडेना

नेमकं काय घडलं?

माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तुम्ही नेमका का प्रवेश केला? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बच्चू कडू म्हणाले, "मला जावं वाटलं म्हणून मी गेलो. शिंदे साहेब, इतरांपेक्षा अधिक मजबूत आहेत, सेवाधारी माणूस आहे. कधीही धावून जाणारे आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहणारे नेते असल्याने त्यांच्यासोबत गेलो असल्याचे सांगितलं. बच्चू कडूंना मंत्री केलं ही आमची चूक झाली असं उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं त्यावर बोलताना कडू म्हणाले, "मला उद्धव साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, पहिले ते मुख्यमंत्री झाले की पहिला मी मंत्री झालो? आम्ही त्यांना घरी जाऊन पाठिंबा दिला, हे ते विसरले आहेत"

Bachchu Kadu
Abhijeet Dipke: 'कोकरोच जनता पार्टी'च्या नावानं फेक अकाऊंट! 'आप' अन् 'काँग्रेस'विरोधात सुरु आहे प्रचार; अभिजीत दिपकेचा भाजपवर गंभीर आरोप

त्यांनी माझ्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार दिला होता, ते माझ्या विरोधात प्रचार करायला आले. तरीसुद्धा शिंदे साहेबांनी मला कॉल केला, त्यांनी बोलावलं, उद्धव साहेबांची भेट घालून दिली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला इकडेच राहायचं आहे. त्यावेळी बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे आमचा पाठिंबा मागत होते. तरी देखील उद्धव ठाकरेंनी विनंती केली की, तुम्ही अपक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला तर माझी ताकद वाढेल आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना घरी जाऊन पाठिंबा दिला. आमच्या पाठिंब्यामुळे ते मुख्यमंत्री झाले आणि नंतर त्यांनी आम्हाला मंत्री केलं हे उद्धव ठाकरे विसरले" असं बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu
NCP merger issue : आम्ही तोंड उघडलं तर बात दूर तक जायेगी, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शशिकांत पाटलांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडेबोल

रस्त्यावरील आंदोलन सोडून सत्तेसाठी बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. याबाबत विचारला असता बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला. म्हणाले, "मग हा प्रश्न अशोकराव चव्हाणांना विचारला का कधी? दोन वेळा ते मुख्यमंत्री होते, तरीसुद्धा ते बीजेपीत गेले त्याला तुम्ही प्रश्न विचारत नाही. तो मोठा माणूस आहे म्हणून? की ते वजनदार आहे म्हणून? आणि मी हलका कार्यकर्ता आहे म्हणून? हे प्रश्न तुम्ही मला विचारता, हे प्रश्न इतरांना का विचारत नाही?" असा सवालही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com