

Pune News: एकनाथ शिंदे यांनी बोलावूनही उद्धव ठाकरेंना भक्कम साथ दिलेले आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत ठाकरेंची ताकद वाढविण्यासाठी झटलेले पण आमदार होण्यासाठी ठाकरेंची दोनदा साथ सोडलेले शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक राहुल कलाटे आता शिंदेंकडे जाऊन धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
शिवसेनेसाठी लढूनही ठाकरेंची साथ न मिळाल्यानेच कलाटे पक्ष सोडत आहेत. तर, पक्षापलीकडे जाऊन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदेंनी ‘छुपी’ रसद पुरविल्याची जाणीव ठेवूनच कलाटे शिंदेंकडे जात असल्याचं बोललं जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पडझडीच्या काळात राहुल कलाटे यांनी मोठी साथ दिली होती. एवढंच नव्हे तर पिंपरी महापालिकेत पक्षाचे नेतृत्व देखील राहुल कलाटे केलेलं आहे. राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत मोठं मताधिक्यही मिळवलं होतं. पण या निवडणुकीत कलाटेंना ठाकरेंची साथ लाभली नव्हती.
दरम्यान, राहुल कलाटे हे आता काही नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा पुन्हा एकदा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच राहुल कलाटे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आगामी निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.