Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी न्यायालयाने खडसेंना अटकेपासून दिलेले संरक्षण सोमवारी संपले आहे.
भोसरी भूखंड घोटाळा (Bhosari Land Scam) प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात १ हजार पानी आरोपपत्र दाखल केले.आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी यांची नावे आहेत. या जमीन घोटाळ्यात खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला आहे.
एकनाथ खडसे यांनी पुण्यात त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
यामुळे खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पोलिसांत खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.(High Court)
अब्बास उकानी हे या जमिनीचे मूळ मालक होते. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 3.75 कोटी रुपयांना हा प्लॉट खरेदी केला होता. नोंदणी निबंधकांच्या या व्यवहाराची कार्यालयात रीतसर नोंदणीही करण्यात आली. व्यवहारानुसार खडसे कुटुंबीय सरकारी नोंदणीप्रमाणे कागदोपत्री मालकही झाले.
भूखंडाची मूळ किंमत ३१ कोटी रुपये असताना गिरीश चौधरी यांनी तो फक्त तीन कोटी रुपयांना कसा विकत घेतला. ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याने ती इतक्या कमी किमतीत कशी काय विकत घेण्यात आली, इतक्या कमी किमतीत व्यवहार कसा झाला, जमीन खरेदी करण्यासाठी चौधरींकडे तीन कोटी कुठून आले, अशा अनेक मुद्द्यांवरून ईडीने तपास सुरू केला होता.
(Ediited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.