Siya Goyal Chats : "कधीच न होणाऱ्या लग्नासाठी..."; 'स्नॅपचॅट'मुळे सियाचा भांडाफोड! मैत्रिणीसोबतचे धक्कादायक 'चॅट' व्हायरल

Ketan Agrawal Murder case : सिया गोयलचे हे चॅट्स समोर आल्यामुळे सियाच्या डोक्यात आधीपासूनच केतनची हत्या करण्याचा किंवा काहीही करून हे लग्न मोडण्याचा प्लॅन असल्याचं समोर आलं आहे. शिवाय ही गोष्ट तिने तिच्या मैत्रिणींना देखील सांगितल्याचंही चॅट्समध्ये दिसत आहे.
Ketan Agrawal Murder | Lohagad Fort | Siya Goyal Chats
Ketan Agrawal Murder | Lohagad Fort | Siya Goyal ChatsSarkarnama
Published on
Updated on

Ketan Agrawal Murder Case : लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून करण्यात आलेल्या केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी आरोपी सिया गोयलच्या मोबाइलमधून डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर केले आहेत. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कारण, केतनच्या हत्येपूर्वी सियाने तिच्या एका मैत्रिणीसोबत स्नॅप चॅटवर केलेलं संभाषण समोर आलं आहे. ज्यामध्ये तिने केतनसोबतच्या लग्नाचा उल्लेख 'कधीच न होणारं लग्न' असा केला आहे. या चॅट्सचे स्क्रिनशॉट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शिवाय हे चॅट्स समोर आल्यामुळे सियाच्या डोक्यात आधीपासूनच केतनची हत्या करण्याचा किंवा काहीही करून हे लग्न मोडण्याचा प्लॅन असल्याचं समोर आलं आहे. शिवाय ही गोष्ट तिने तिच्या मैत्रिणींना देखील सांगितल्याचं या चॅट्समध्ये दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या चॅट्सचे स्क्रिनशॉटमध्ये सिया तिच्या मैत्रिणीला म्हणते की, 'तुझ्या आधार कार्डच्या दोन्ही बाजू पाठव. लग्नासाठीच्या तिकीटासांठी ते लागणार आहे. जे लग्न होणार नाही, तरीही तू पाठवून ठेव.' त्यानंतर तिची मैत्रीण रिप्लाई देते की, 'व्हॉट्सॲपवर कॉपी पाठवल्या आहेत.' या चॅटमुळे आता सियाचा पाय आणखी खोलात असल्याचं समोर आलं आहे.

Ketan Agrawal Murder | Lohagad Fort | Siya Goyal Chats
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंवर मनमानी अन् एकतर्फी कारभाराचे आरोप; आणखी एक आदेश वादाच्या भोवऱ्यात : कोर्टात चॅलेंज

तर शुक्रवारी पोलिसांनी सियाचा आणखी एक मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमधील चॅट्समध्ये सिया आणि चेतन हे एकमेकांशी कोडवर्डमध्ये बोलायचे. ते असे का बोलायचे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, 'सिया आणि चेतनला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडचे मोबाइल जप्त केले होते. मात्र त्यानंतर सियाकडे आणखी एक मोबाइल असल्याचं समजल्यानंतर तो मोबाईलही जप्त केला आहे. या मोबाईलमधून आणखी काही माहिती समोर येऊ शकते.'

Ketan Agrawal Murder | Lohagad Fort | Siya Goyal Chats
Asim Sarode : ठाकरेंच्या वकिलाला 'अर्ध-पाकिस्तानी' म्हणणं शिंदेंच्या आमदाराला भोवणार; थेट कायदेशीर नोटीसच धाडली...

दरम्यान, आरोपी चेतन आणि सिया यांच्या संपर्कातील काही तरुणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. या जबाबानुसार केतनच्या हत्येच्या कटाची माहिती चेतनच्या एका वर्गमित्राला आधीपासूनच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर हा तरुण बीडचा रहिवासी असून तो मे महिन्यापासून चेतनच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. चेतनच्या या मित्राकडून आणखी काही माहिती मिळवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com