

Pune News : पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये पेलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांला राज्य सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं गेलं नसल्याची गोष्ट मेधा कुलकर्णी यांनी अमित शहा यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर सोमवारी (ता.16) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.
मेधा कुलकर्णी यांनी अमित शाह यांची भेट घेत पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेले पुण्यातील स्वर्गीय संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे दिलेले आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलं नसल्याचं सांगितलं.
त्यामुळे शासकीय सेवेसंदर्भात महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारने योग्य ते सूचित करावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकदा शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना आदेश दिले आहेत
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी पुणे पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आसावरी हिला बोलवून तिच्याशी चर्चा करून तिच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महानगरपालिकेत निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले.
तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रकिया पूर्ण केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. जगदाळे यांनी नगरविकास विभागाकडे सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. या संदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिफारस पत्र दिले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांनी महापालिकेला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
महापालिकेने ऑगस्ट महिन्यात आसावरी जगदाळे यांनी प्रस्ताव पाठवला होता. पण त्यानंतर त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज आयुक्तांशी चर्चा करून जगदाळे यांच्या प्रस्तावाबाबत विचारणा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही आयुक्तांसोबत चर्चा केली.
आसावरी जगदाळे यांच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महापालिकेत देऊन त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शासन सहानुभूतिपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगरविकास विभागाकडून प्रस्ताव आली की पुणे महापालिकेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता यास दुजोरा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.