Pune Accident Porsche Update : पोलिसांच्या भीतीने ससूनच्या कर्मचाऱ्याने ठोकली धूम !

Pune Hit And Run Case : ससून मधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. डॉ. हळनोर यांनी ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सॅम्पल घेतले अथवा ..
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune Porsche Crash News : कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये प्रत्येक दिवशी नवीन गोष्टी आता समोर येत आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरसह एका व्यक्तीला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. यामुळे ससूनमधील रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्याने पोलीस अटक करतील या भीतीमुळे धूम ठोकली आहे. चौकशीच्या भीतीने पळून गेलेल्या या कर्मचाऱ्याला पकडण्यासाठी आता पुणे पोलिसांनी पथक नेमले असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

कल्याणीनगर कार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे घेण्यात आलेल्या ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केल्याचे समोर आले होते. गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल ससून येथील डॉक्टरांनी घेतले आणि ते डस्टबिन मध्ये फेकून दिले. यानंतर संबधित डॉक्टरांनी दुसऱ्या कुणाचे तरी ब्लड सॅम्पल घेऊन ते अल्पवयीन मुलाचे असल्याचे दाखविले. असा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Hit And Run Case
Porsche Hit And Run Case : चौकशी समिती म्हणजे 'उंदराला मांजराची साक्ष', माजी आयएएस अधिकारी झगडेंचा गंभीर आरोप !

पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेले डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले असल्यास समोर आले होते. ससून मधील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. डॉ.हळनोर यांनी ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सॅम्पल घेतले अथवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ब्लड सॅम्पलच्या साठ्या मधून ते उचलण्यात आले, असा पोलिसांचा अंदाज असून याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.

या दोन डॉक्टरांच्या सोबतच ससून रुग्णालयात शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या अतुल घटकांबळेला पोलिसांनी अटक केली आहे. हा शिपाई या प्रकरणांमध्ये झालेल्या पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर या विभागातील इतर कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्याचे संकेत पोलिसांनी (Police) दिले होते. या प्रकरणांमध्ये आपली चौकशी होऊ शकते, या भीतीमुळे रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी चक्क पळून गेल्याचे समोर आले आहे. पळून गेलेल्या या कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकाची निर्मिती केली आहे.

Pune Hit And Run Case
Porsche Hit And Run Case : पुणे 'हिट अ‍ॅण्ड रन' जनआक्रोशापुढे सरकारचे 'डॅमेज कंट्रोल' झाले निष्प्रभ !

दरम्यान, ससून मध्ये घडलेल्या या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्य समिती नेमण्यात आली आहे. ही समिती ससून मध्ये दाखल झाली असून समितीमार्फत रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे या चौकशीपूर्वीच या कर्मचाऱ्यांनी पळ काढला असल्याचं समोर आला आहे. या चौकशीसाठी राज्य सरकारने (State Goverment) जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ.पल्लवी सापळे, मुंबईतील डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. सुधीर चौधरी यांची त्रिसदस्य समिती नेमली आहे. विशेष म्हणजे या समितीमधील डॉक्टरांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Pune Hit And Run Case
Satara NCP News: डॉ. अजय तावरे यांना अटक हा सुसंस्कृत कोरेगावला लागलेला काळा डाग...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com