MLC Election : पुण्यातील भाजप-राष्ट्रवादीच्या 6 माजी आमदारांची 'विधानपरिषदेसाठी' फिल्डिंग : चर्चेत नसलेली 'सरप्राईज' नावेही समोर

MLC Election : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे.
Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
DCM Sunetra Pawar, CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

MLC Election : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची १ जूनपर्यंत मुदत असून, १८ जूनला मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ सर्वाधिक असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. पण दौंड नगरपालिकेतील नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की भाजप खेचून आणणार याकडे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीची खरी रंगत पक्षांतर्गत आणि महायुतीमधील शह-काटशहाच्या राजकारणात दडली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या 'माजी' आमदारांना विधानपरिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसनाची नामी संधी दिसू लागली आहे. पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही निवडणूक 'लाईफलाईन' वाटत आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील पराभूत दिग्गजांनी या जागेवर डोळा ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढण्यासाठी दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे हे माजी आमदार इच्छुक आहेत. याशिवाय अजित गव्हाणे, रणजित शिवतारे, दीपक मानकर यांचीही नावे चर्चेत आहेत. कदाचित सुनेत्रा पवार यांच्याकडून धक्कातंत्राचा वापर करून चर्चेत नसलेले नावही समोर येऊ शकते, तर भाजपमध्ये संग्राम थोपटे, संजय जगताप, गणेश बिडकर, यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
Pune MLC election : विधानपरिषदेचा धुरळा : पुण्यात 'स्थानिकच्या' गणितात भाजप, राष्ट्रवादीतच चुरस : महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच

असे आहे पक्षीय बलाबल :

जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांची एकूण संख्या सुमारे ८०४ इतकी आहे. त्यात सर्वाधिक ३४७ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. त्यानंतर भाजपचे ३१९, शिवसेनेचे ६८ सदस्य आहेत. काँग्रेसचे १९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७ सदस्य आहेत.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
MlC Election : विधानपरिषदेचा धुराळा : सोलापूर 'स्थानिक'चा बिगुल वाजणार; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जुन्या गडावर भाजपची मजबूत पकड

दौंडमधील २३ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे भाजपचे एकूण संख्याबळ ३४२ होत असले तरी ते राष्ट्रवादीपेक्षा पाचने कमीच आहे. गेल्या दोन टर्म या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले आमदार होते. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा नैसर्गिक दावा आहे. मात्र, महापालिकेत वाढलेले वर्चस्व पाहता भाजप ही जागा खेचून आणण्यासाठी उत्सुक आहे. जर दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आणि मैत्रीपूर्ण लढत झाली, तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर 'घोडेबाजार' होण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com