Ajit Pawar News : ठाकरे गटाचा उमेदवार चक्क अजितदादांच्या पाया पडला; नेमकं काय घडलं?

Loksabha Election 2024 : बारणेंना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करेल, असा चेहरा ठाकरे गटाकडून हेरण्यात आला.
Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तसा पुणे -पिंपरी चिंचवडच्या राजकारणात चांगलाच दबदबा राहिला आहे. पण लोकसभा निवडणुकीआधी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरीत अजितदादांना मोठा धक्का बसला होता.अजित पवारांना बंडात साथ देणारे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला.

विशेष म्हणजे वाघेरेंनी ठाकरे गटाची मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही मिळाली आहे.पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या Ajit Pawar वाघेरे हे पाया पडले. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar News
Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात मोदींची सभा जोरदार, पण शाहू महाराजांवर थेट टीका करणे टाळले...

पिंपरीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे Anna Bansode यांच्या मुलीचं विवाहसोहळा नुकताच पार पडला.या विवाहसोहळ्याला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. याचवेळी ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरेही त्याठिकाणी आले.अजितदादा तिथे असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांची गाठ घेतली. एवढेच नव्हे तर वाघेरे हे चक्क अजित पवारांच्या पायाही पडले.अजित पवारांनी देखील हसून त्यांना दाद दिली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे Shrirang Barne हे एकनाथ शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे मावळमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार हे निश्चित मानले जात होते. पण शिंदे गटाकडे श्रीरंग बारणे यांची उमेदवार पक्की समजली जात असताना ठाकरे गटाचा उमेदवार कोण, याची उत्सुकता होती. त्यामुळे बारणेंना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करेल, असा चेहरा म्हणजे संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे गटाकडून हेरण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या संजोग वाघेरे यांचा डिसेंबर महिन्यात शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश घडवून आणण्यात आला. डिसेंबरमध्ये संजोग वाघेरे हे ठाकरे गटात आले असले तरी निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी खूप आधीपासूनच सुरू केली होती.आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास दाखवतानाच थेट त्यांना मावळमधून श्रीरंग बारणेंच्या विरोधात उमेदवारीही जाहीर केली.

संजोग वाघेरेंनी Sanjog Waghere देखील ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.त्यांचा धडाक्यात प्रचार सुरू असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्जही भरला होता.वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर अजित पवारांवर कोणत्याही प्रकारची टीका केलेली नाही.वाघेरे यांचं राजकीय कारकीर्दीत अजित पवारांचं खूप मोठं योगदान असल्याचं अनेकदा त्यांनी बोलूनही दाखवलं आहे.

Ajit Pawar News
Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरे संपले; मग PM मोदींच्या सभांचा धडाका कशासाठी?

संजोग वाघेरेंना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळालेला आहे. त्यांचे वडील भिकू भिमाजी वाघेरे पाटील हे पिंपरी गावाचे सरपंच. पुढे ते महापौर देखील बनले. वाघेरे घराण्याचे नाव पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आदरपूर्वक घेतले जाते. संजोग वाघेरे हे 35 ते 40 वर्षे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत.

नगरसेवकपदापासून सुरू झालेला प्रवासात त्यांनी महापौर, पीसीएमटीचे सभापती,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद आदी पदे भूषवली आहेत.2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे हे लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. मात्र, 2019 मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते.त्यावेळी वाघेरे यांनी माघार घेतली होती. मात्र,यावेळी निवडणूक लढण्याचे निश्चित करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar News
Sharad Pawar Satara : उदयनराजेंना खुन्नस; शरद पवारांनी दुसऱ्यांदा उडवली कॉलर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com