Nasarapur Case: नसरापूर अत्याचार प्रकरणात भक्कम पुरावे! पंधरा दिवसांत 1100 पानांचे दोषारोपपत्र दाखल; पुरावे काय? जाणून घ्या

Nasarapur Case: या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. नसरापून येथे रास्ता रोको अंदोलन आणि पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आला होता.
Pune Nasarapur Case
Pune Nasarapur Case
Published on
Updated on

Pune Nasarapur Case: नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत तब्बल १ हजार १०० पानी दोषारोपपत्र आज न्यायालयात दाखल केले. घटनाक्रम, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल असे महत्त्वाचे पुरावे दोषारोपपत्रात जोडण्यात आले आहेत.

Pune Nasarapur Case
Imtiaz Jaleel: परदेशी शेखांना मिठी मारण्यावरुन जलील यांनी PM मोदींना डिवचलं! म्हणाले, 'त्यांची' माफी मागा...

या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. नसरापून येथे रास्ता रोको अंदोलन आणि पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता. १६) रात्री दोषारोपपत्र सादर केले. यावेळी गिल, विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि तपास अधिकारी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विजयमाला पवार उपस्थित होत्या.

Pune Nasarapur Case
Gokul Milk Rate : CNG, पेट्रोल, डिझेलनंतर आणखी एका दरवाढीचा शॉक : कोल्हापूरमध्ये होणार 'गोकुळ'च्या नवीन दराचा निर्णय

एक मे रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे आरोपी भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा वेगाने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. तपासादरम्यान आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना (री-क्रिएशन) करण्यात आली. आरोपी घटनास्थळी कसा पोहोचला?, चिमुरडी कुठे खेळत होती?, तिला कोठून नेण्यात आले? आणि गोठ्यात अत्याचार नेमका कुठे झाला?, याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी पुन्हा उभा केला.

Pune Nasarapur Case
CJI Surya Kant: 'झुरळ' टिप्पणीवरुन टीका सुरु झाल्यानं सरन्यायाधिशांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अत्यंत वेदना झाल्या, मी बेरोजगार तरुणांना...

तपासादरम्यान परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. घटनेच्या वेळी परिसरात लपाछपी खेळणाऱ्या १० ते ११ वर्षे वयोगटातील दोन मुलांनी आरोपीला गोठ्याकडे जाताना पाहिल्याचे समोर आले असून, हे दोघे या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार ठरणार आहेत. दोषारोपपत्रात बालिकेचा शवविच्छेदन अहवालही जोडण्यात आला आहे. आरोपीने बालिकेच्या तोंडात बोळा कोंबल्याचे तसेच तिच्या शरीरावर जखमा आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Pune Nasarapur Case
Petrol Price Hike : निवडणूक संपताच मोठा दणका, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, पाहा पुणे-मुंबईतील नवीन दर

दोषारोपपत्रात असलेले पुरावे :

- घटनास्थळ आणि परीसरातील सीसीटीव्ही फुटेज

- ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब

- घटनेने ५० हून अधिक फोटो

- वैद्यकीय पुरावे

- न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल

- घटनाक्रमाचे वर्णन

- आरोपीने दिलेला जबाब

- तांत्रिक तपास व त्याचे अहवाल

Pune Nasarapur Case
PM मोदींचे सल्लागार होणार नवे अर्थमंत्री? रिक्त जागेवर लढणार निवडणूक, सगळा प्लॅन ठरला! पुण्याशी आहे खास कनेक्शन

याप्रकरणी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितलं की, "या गुन्ह्यातील आरोपीवर यापुर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत. तांत्रीक कारणांमुळे त्या गुन्ह्यांत त्याची सुटका झाली आहे. मात्र या गुन्ह्यात त्याच्या विरोधात सक्षम पुरावे आहेत. पुणे ग्राणीम पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत अचूक तपास केलेला आहे. त्यामुळे मुलीला न्याय मिळणार आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात इतक्या कमी वेळेत दोषारोपपत्र दाखल झाल्याची ही पहिलीच वेळ असावी"

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं की, "आरोपीला कठोरातील कठोर शासन होण्यासाठी आवश्यक त्या कलमांनुसार या गुन्ह्याचा तपास करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अत्यंत नैसर्गिक पद्धतीने तपास झाला असून त्यासाठी आमची टीन गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने कार्यरत होती. कायदेशीर बाबी तपासून दोषारोपपत्र तयार करण्‍यात आले आहे. कमीत काम वेळेत मुलीला न्याय मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे"

Pune Nasarapur Case
NEET Paper Leak Case : NEET पेपर फोडणारा मास्टमाईंड प्रा. कुलकर्णीनंतर पुण्यातीलच एका जीवशास्त्राच्या प्राध्यापिकेलाही अटक

या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल

भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) (अपहरण), ६४ व ६५ (बलात्कार), १०३ (खून), ७४ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळजबरी करणे), १४० (१) यांसह लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आठवड्यात खटला सुरू होणार

दोषारोपत्र दाखल झाल्याने आरोपीवर लवकरात लवकर आरोप निश्चित करून पुढील आठवड्यात खटला सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एका विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यासाठी लवकरच न्यायालय निश्चित होईल व त्यात जलदगतीने सुनावणी होणार आहे. खटल्याची सुनावणी इन कॅमेरा होणार आहे, अशी माहिती गिल आणि ॲड. मिसर यांनी दिली.

Pune Nasarapur Case
Ashok Kharat: खरातच्या स्वीय सहाय्यकाच्या मृत्यू अन् संशयाचा धूर! मंत्र्यांकडं इशारा करत सुजात आंबेडकरांचा धक्कादायक दावा

तांत्रिक तपास ठरणार महत्त्वाचा

गुन्हा घटल्याच्या दिवशी आरोपी कुठे होता येथपासून त्याला ताब्यात घेण्यापर्यंत अनेक तांत्रिक बाबींचा अत्यत बारकाईने पोलिसांनी तपास केलेला आहे. तो सर्व घटनाक्रम आणि तांत्रित तपास हे आरोपीच्या विरोधात गुन्हा सिद्ध होवून त्याला शिक्षा सुनावण्यात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासह या सर्व बाबीना पुरक असलेले वैद्यकीय पुरावे पोलिसांकडे आहे. सर्व वैद्यकीय पुरावे पॉझिटिव्ह आहेत, असे ॲड. मिसर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com