Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांनी गायकवाड-पडळकरांना हलक्यात सोडलं.. पण अजितदादांनी धाडसं दाखवलं! मारकुट्या सुरज चव्हाणाला दुहेरी दणका

Shinde Fadnavis News : सध्या महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असल्याने चुकीच्या वागण्यावर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारमधील भाजपसोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षामधील नेत्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन काळातच सभागृहाबाहेर मारहाण केली. त्यामुळे या नेत्यानी केलेल्या या कारनाम्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार यावर विरोधकासह सर्वांचाच महायुतीवर फोकस होता. जनतेनी आठ महिन्यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत दिले.

दुसरीकडे सध्या महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असल्याने चुकीच्या वागण्यावर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, एकीकडे एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना तर सीएम देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना हलक्यात सोडले पण अजितदादांनी धाडस दाखवत सुरज चव्हाणला राजनीमा देण्यास सांगितले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजले ते प्रामुख्याने सभागृहाबाहेरील विविध कारनाम्यानी. सत्तेत असलेल्या भाजप (Bjp), एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीने मारहाण करीत वर्तुळ पूर्ण केले. त्यामुळे या तीन पक्षाच्या नेतेमंडळीने या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले. नेत्याच्या मारहाणीचे वर्तुळ पूर्ण झाले तरी कारवाई करण्याचे धाडस दाखवत अजित पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Thackeray BJP meeting : ठाकरे-फडणवीसांच्या भेटी शिंदेंच्या शिवसेनेला झोंबतेय; सरनाईकांनी पळ काढणारे अन् संधीसाधू म्हणत डिवचले!

अधिवेशन सुरु होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. ते जेवण खराब असल्याचे लक्षात आले. त्याच संतापात त्यांनी कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणावरून आमदार गायकवाड वादात अडकले. त्यानंतर या प्रकरणावरून विरोधकांनी कारवाईची मागणी केली. मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. मात्र, अधिवेशन संपत असताना त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे (shivsena) मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, शंभूराज देसाई, भरत गोगावले, योगेश कदम, माजी मंत्री संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे आजी-माजी मंत्री या-ना त्या कारणाने अडचणीत आले होते. त्यांच्यावरील आरोपाचे खंडन करण्यात व दोषी नसल्याचे सांगण्यातच एकनाथ शिंदे यांचा बराच वेळ गेला.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

दुसरीकडे विधान भवनाच्या आवारातच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोबतच्या वादानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधिमंडळ परिसरातच आव्हाडांच्या समर्थकला मारहाण केली होती. विशेष म्हणजे यातील एका आरोपीवर मकोकाची कलम होते. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना या सर्व प्रकाराबाबत सभागृहाची माफी मागितली तर जितेंद्र आव्हाड यांना देखील या ठिकाणी सभागृहाची माफी मागावी लागली. त्यानंतर या प्रकरणात चौकशी करून कारवाईचे संकेत देत ठोस कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.

भाजपची ओळख एक शिस्तबद्ध पक्ष अशी राहिली आहे. त्यामुळे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर कारवाई केली जाईल, असे वाटत होते. मात्र, पडळकर यांनी विधिमंडळाच्या आवारात गुन्हेगार असलेल्या व्यक्तीला आणल्यानंतरही कुठलीच कारवाई झाली नाही.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
BJP internal conflict : बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे, पडळकरांना वॉर्निंग; प्रदेशाध्यक्षांनी तंबी दिल्याने चाप बसणार का?

त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्याने अधिवेशन पार पडल्यानंतर मारहाण करीत वर्तुळ पूर्ण केले. लातूरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पत्ते खेळण्याविरोधात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध केला म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या आंदोलकांना मारहाण केली. त्यामुळे या घटनेवरून विरोधकांनी आक्रमक होत कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे अजितदादांनी या घटनेची गंभीरपणे दाखल घेत सुरज चव्हाणला राजीनामा देण्यास भाग पाडले.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Manikrao Kokate : एक्का, दुर्री, तिर्री... दोन प्रकरणांमध्ये वाचलेले कोकाटे तिसऱ्या प्रकरणात 'पॅक' होणार?

एकनाथ शिंदे व सीएम फडणवीसांनी गायकवाड व पडळकरांवर कारवाई न करता हलक्यात सोडले पण अजितदादांनी या प्रकरणात धाडसं दाखवत मारकुट्या सुरज चव्हाणाला राजीनामा देण्यास भाग पडले. दुसरीकडे सुरज चव्हाण यांच्यासह बारा जणांच्या विरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Kokate viral video : सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्या कोकाटेंचा व्हिडीओ शूट केला कोणी? घर का भेदी लंका ढाये?

लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक अशी दोन पथके सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्याचे समजते. मारहाणीच्या घटनेनंतर अखिल भारतीय ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाणांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे लातूर शहरात तणावाचे वातावरण आहे. त्याशिवाय संपूर्ण मराठवाडयात छावा संघटनेने आक्रमकपणे आंदोलन केले आहे. त्याचमुळे अजितदादांनी एकीकडे मारकुट्या सुरज चव्हाणाला राजीनामा देण्यास तर भाग पडलेच त्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास लावला आहे. त्यामुळे येत्या काळात सूरज चव्हाणांच्या अडचणीत भरच पडली आहे.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Raj –Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ‘एक’ अन् काँग्रेसपुढे पेच ! महाविकास आघाडीत फूट?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com