Thane News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या शिवसेना कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांची ज्युपिटर रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली. तदपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी वावीकर रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याची तपासणी केली.
ज्युपिटर रुग्णालयात तब्बल पाऊण तास मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. गोळीबार झाल्यानंतर जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांना ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या दोघांवर तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. गायकवाड यांची तब्येत चिंताजनक असून पाटील यांची तब्येत स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान सकाळपासूनच रुग्णालयात राजकीय नेत्यांची वर्दळ सुरू झाली होती. त्यातच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तसेच शिवसेनेच्या पदाधिकांनी रुग्णालयात धाव घेतली होती. तर दुपारी मुख्यमंत्री शिंदे रुग्णालयात दाखल झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यांनी गायकवाड आणि पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांनी डॉक्टरांशीही चर्चा केली. जवळपास पाऊण तास मुख्यमंत्री शिंदे हे रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्री आल्याने याप्रकरणी काही तरी बोलतील असे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना वाटत होते. मात्र मुख्यमंत्री न बोलता रुग्णालयातून पुढे रवाना झाले.
सीएम वावीकर रुग्णालयात...
शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्याची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठाण्यातील वावीकर रुग्णालयात पार पडली. डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शनिवारी तपासणीसाठी मुख्यमंत्री घराबाहेर पडले. त्यांनी वावीकर रुग्णालयात जाऊन डोळ्याची तपासणी केली. त्यानंतर माघारी परतताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयाकडे आपला मोर्चा वळवला होता.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.