Rajasthan Assembly Election : मोठी बातमी! राजस्थान विधानसभेच्या मतदानाची तारीख बदलली; 'या' दिवशी होणार मतदान

Election Commission Announcement : मतदानाची तारीख बदलण्यामागे 'हे' आहे कारण...
Rajasthan Assembly Election
Rajasthan Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांपूर्वी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. तसेच या निवडणुकासाठी भाजप, काँग्रेससह प्रादेशिक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

या पाच विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला, पण आता पाच राज्यांच्या निवडणुकांमधील राजस्थानच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

Rajasthan Assembly Election
Israel vs Hamas War : जगातल्या तब्बल २८ देशांना मान्य नाही इस्राईलचं अस्तित्व; काय आहे कारण ?

केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी राजस्थान राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या तारखेत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. आता राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 23 नोव्हेंबरऐवजी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

मोठ्या प्रमाणात लग्न समारंभाच्या तारखा असल्याने मतदान दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमांची केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी घोषणा केली. यात मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर, मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते.

पण आता राजस्थान विधानसभेसाठीच्या मतदानाची तारीख बदलली आहे. मात्र,पाचही राज्यांच्या विधानसभेची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

Rajasthan Assembly Election
Attack on Heramb Kulkarni : हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण : फडणवीसांकडून दखल अन्...

मध्य प्रदेशात भाजपची सत्ता असून, तिथे विधानसभेच्या 230 जागा आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असून, तिथे विधानसभेच्या 200 जागा आहेत, तर मिझोराममध्ये भाजपची सत्ता असून 40 जागा आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर 90 जागा आहेत. तेलंगणामध्ये 119 जागांवर विधानसभा निवडणूक होत असून, तिथे भारत राष्ट्र समितीची (बीआरएस)सत्ता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Rajasthan Assembly Election
Maratha Reservation : 'धाराशिव'चा दौराच रद्द...! मराठा समाजाच्या 'गावबंदी'चा खासदार, आमदारांनी घेतला भलताच धसका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com