Pramod Sawnat News : गोव्यात तिसरा जिल्हा होणार; प्रक्रिया सुरु असल्याची खुद्द मुख्यमंत्री सावंतांची माहिती

Goa New District Formation News : राज्यात सुरु असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याची मागणीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी तिसरा जिल्हा होणार, यासाठी प्रक्रिया सुरु आहे. मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर तो अस्तित्वात येईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
Pramod Sawant.jpg
Pramod Sawant.jpgSarkarnama
Published on
Updated on

Panaji News : गोव्यात तिसरा जिल्हा होण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बुधवारी (8 डिसेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून तिसऱ्या जिल्ह्याची मागणी गोव्यात जोर धरत आहे.

पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी विविध क्षेत्रासाठी कंत्राट पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती दिली. त्यासोबतच सरकारी नोकरी भरती प्रक्रिया सुरुच राहिल, असे सांगितले. राज्यात सुरु असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याची मागणीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी तिसरा जिल्हा होणार, यासाठी प्रक्रिया सुरु आहे. मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर तो अस्तित्वात येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawnat) म्हणाले.

Pramod Sawant.jpg
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या अडचणीत भर; खंडणी प्रकरणी आता 'या' साथीदाराचे घेतले व्हॉईस सॅम्पल्स

राज्यात तिसऱ्या जिल्ह्याची मागणी वारंवार होत आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक (Ravi Naik) यांनी देखील याबाबत भाष्य केले होते. यासाठी ते आग्रही असल्याचे त्यांनी म्हटले होते. याशिवाय सभापती रमेश तवडकर आणि वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकरांनी देखील तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेबाबत सकारात्मकता दर्शवली होती. दरम्यान, आता खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावर भाष्य केल्याने तिसरा जिल्ह्याच्या स्थापनेबाबत आशावाद व्यक्त केला जात आहे.

Pramod Sawant.jpg
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राज्यात आदिवासीबहूल तिसरा जिल्हा असावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून गोव्यात होत आहे. यासाठी मंत्री रवी नाईक आग्रही असल्याचे पाहायला मिळाले होते. सभापती रमेश तवडकरांनी देखील याला दुजोरा दिला होता. तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय काणकोण येथे असावे असा देखील एक प्रस्ताव समोर आला होता.

Pramod Sawant.jpg
Pune Former corporators join BJP : पुण्यातील माजी नगरसेवकांनी 'या' कारणांमुळे शिंदेंचा पर्याय झुगारून धरली भाजपाची वाट

दक्षिण गोव्याचे विभाजन करुन तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी होत आहे. गोवा राज्य सरकारने तिसऱ्या जिल्ह्याचा प्रस्ताव मांडल्यास काणकोण, सांगे, धारबांदोडा आणि केपे या तालुक्यांचा मिळून हा नवा जिल्हा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

Pramod Sawant.jpg
Patangrao Kadam : 'रयत'मध्ये अर्धवेळ शिक्षक ते भारती विद्यापीठाचे संस्थापक, असा होता पतंगराव कदमांचा संघर्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com