BJP Candidate Defeat : IPS ची नोकरी सोडून कमळ हाती घेत निवडणूक लढवली; पण मतदारांनी पाडलं, मोदी-शहांच्या 'होम ग्राउंड'वरच धक्कादायक निकाल

Gujarat Election Result Defeat of Manoj Ninama : मोदी-शहांच्या गुजरातमध्ये आश्चर्यकारक निकाल लागला आहे. राजकारणासाठी IPS ची नोकरी सोडून निवडणूक लढवणाऱ्या माजी अधिकाऱ्याचा पराभव झाला आहे.
Manoj Ninama Defeat
Manoj Ninama DefeatSarkarnama
Published on
Updated on

Defeat of Manoj Ninama : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपची त्सुनामी पाहायला मिळाली. पण काही ठिकाणी आश्चर्यकारक निकाल लागल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IPS ची नोकरी सोडून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मनोज निनामा यांचा पराभव झाला आहे. राज्यात भाजपची त्सुनामी असतानाही ते पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार राहिलेल्या व भाजपत गेलेल्या भूपत भयाणी यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.

निनामा हे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी होते. ते ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, मनोज निनामा यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणात येण्यासाठी त्यांनी आयपीएसची नोकरी सोडली.

Manoj Ninama Defeat
BJP MLC List : भाजपने विधानपरिषदेसाठी पाठवलेली 30 जणांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मागे पाठवली, अर्धी नावे कमी, कुणाचा पत्ता कट?

यानंतर भाजपनं त्यांना शेवटच्या क्षणी अरावलीतील शामलाजी तालुक्यातील ओध जिल्हा पंचायतीमधून तिकीट दिलं होतं. निनामा यांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवली. मात्र तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला. कॉंग्रेसचे हेवीवेट नेते सुरेश निनामा यांनी २७४४ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला.

मनोज निनामा यांच्यावर माजी आयपीएस अधिकारी आणि जीवलग मित्र पी. सी. बरंडा यांचा मोठा प्रभाव आहे. बरंडा यांनीही पोलीस विभागात बराचकाळ सेवा दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी राजकारणात एण्ट्री केली. अन्न आणि पुरवठा, ग्राहक मंत्रालयाचा कारभार त्यांनी पाहिला. ते अरावली जिल्ह्याच्या भिलोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बरंडा यांच्याच पावलावर पाऊल टाकत निनामा यांनी राजकारणात प्रवेश केला.

Manoj Ninama Defeat
Bjp Politician: भाजप नेत्याचा थाटच नादखुळा! मतदारसंघात स्वतः च्या प्रायव्हेट जेटनं फेरफटका; घराजवळच आहेत दोन हेलिपॅड

याशिवाय या निवडणुकीत, गुजरातमध्ये आम आदमी पक्षातून पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेले भूपत भयाणी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भूपत भयाणी हे आम आदमी पक्षाकडून आमदार झाले होते, मात्र नंतर त्यांनी राजकीय भूमिका बदलत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीसह आम आदमी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com