Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ते आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. नव्या पंतप्रधानांची निवड होईपर्यंत ते या पदावर कायम राहणार आहेत. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, यासंदर्भात त्यांनी ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांच्याशीही चर्चा केली आहे.
अँडी बर्नहॅम हे पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असून लेबर पक्षाच्या नेतृत्वासाठीही त्यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. या घोषणेमुळे ब्रिटनमधील राजकीय अस्थिरतेच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. तर मागील 10 वर्षांत पंतप्रधानपद सोडणारे कीर स्टार्मर हे सहावे पंतप्रधान ठरणार आहेत.
देशाला उद्देशून केलेल्या भाषणाच्या शेवटी कीर स्टार्मर भावुक झाले होते. ते म्हणाले, "माझ्या पक्षासमोर आता हा प्रश्न आहे की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का? या प्रश्नावर माझ्या संसदीय पक्षाने दिलेले उत्तर मी ऐकले आहे आणि त्याचा आदर करत आहे."
यानंतर त्यांनी लेबर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. नव्या पक्षनेत्याची निवड होईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कामकाज पाहणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्टारमर यांच्या लेबर पार्टीच्या 100 हून अधिक खासदारांनी जाहीरपणे पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा किंवा राजीनाम्यासाठी अंतिम मुदत जाहीर करावी, असं म्हटलं आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कीर स्टार्मर यांच्यावर लेबर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याचा दबाव वाढत होता.
पक्षाला नव्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना पक्षांतर्गत बळावत होती आणि अँडी बर्नहॅम यांचे नाव पुढे येत होते. मागील आठवड्यात उत्तर इंग्लंडमधील मेकरफील्ड पोटनिवडणुकीत अँडी बर्नहॅम यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रतिस्पर्ध्याचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांचा दावा अधिक मजबूत झाल्यामुळे लेबर पक्षाचे पुढील नेते आणि ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.