
Pune News : मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना अजित पवार यांनी मंत्रीपदापासून दूर ठेवले होते. यामुळे ते नाराज होते. याबाबत त्यांनी स्पष्टपणे आपण नाराज असल्याचेही म्हटले होते. यानंतर ते भाजपच्या वाटेवर देखील असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र आता पक्षाकडून त्यांची आब राखली असून योग्य सन्मान केला जाईल असे संकेत मिळत आहेत. यामुळेच भुजबळ यांनी देखील मागचं विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे उघड होत आहे.
महायुती सरकारचा मागच्या महिन्यात विस्तार झाला झाला. मात्र पक्षातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले होते. यामुळे ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अशीच नाराजी भुजबळ यांनी व्यक्त करताना मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवली होती.
भुजबळ पक्ष सोडतील अशा चर्चा रंगल्या होत्या. तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. ते त्यांनी बरोबर एकाच कारमधून प्रवास केल्यामुळे ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असा अनेकांनी दावा देखील केला होता.
दरम्यान भुजबळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसोबत एका व्यासपीठावर एकत्र देखील आले होते. यामुळे ते आता परत घर वापसी करतील अशाही चर्चा सुरु झाल्या होत्या. आता मात्र सर्वच किंतू परंतू आणि तर्क वितर्कांना पूर्ण विराम लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीमध्ये होणाऱ्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थिती लावणार आहेत. यामुळे आता ते कोठेच जाणार नसून ते राष्ट्रवादीतच असतील हे पक्कं झालं आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच माहिती दिली असून भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचे तटकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भुजबळ यांनी नाशिक येथे पतंग उडवण्याचा आनंद लुटताना अनेकांना इशारा दिला होता. त्यांनी, आपण अनेकांच्या पतंगी अशा कापल्या आहेत. आता आपल्या सहकाऱ्यांसोबत पतंग उडवू. माझी पतंग कोण कापणार? मी येथील नसून, माझा येथे जन्म नसूनही जनतेनं माझ्यावर प्रेम केलं. मला या मतदारसंघात मागील २० वर्षे आणि पुढील पाच वर्षे आमदारकी दिली, असे म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.