Loksabha Election 2024 : अनंत गितेंवर टीका करताना विकास गोगावलेंची जीभ घसरली; म्हणाले, कानाखाली लगावली....

Vikas Gogavale रायगड येथील सभेत विकास गोगावले यांची जीभ घसरली आहे. त्यांनी सभेत आक्रमकपणे भाषण करत अनंत गितेवर टीकेची झोड उठवली आहे.
Vikas Gogavale, Anant Geete
Vikas Gogavale, Anant Geetesarkarnama

Raigad Loksabha News : महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्यावर टीका करताना आमदार भरत गोगावले यांचे सुपूत्र विकास गोगावले यांची जीभ घसरली आहे. महापूर, अतिवृष्टी विषयी प्रश्न विचारले असता श्री. गिते हसत होते. मी असतो तर कानाखाली लगावली असती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्याची सध्या रायगडमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

रायगड येथे महायुतीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत विकास गोगावले बोलत होते. येथील सभेत विकास गोगावले यांची जीभ घसरली. त्यांनी सभेत आक्रमकपणे भाषण करत अनंत गितेवर टीकेची झोड उठवली आहे.

विकास गोगावले म्हणाले, महापूर आणि अतिवृष्टीच्या प्रश्नावर ज्या पद्धतीने अनंत गिते हसतात निर्लज्यपणे बोलतात. माझ्या वडीलांपेक्षाही अधिक वय त्यांचे आहे. पण, तेथे मी असतो, तर तेथेच कान फोडले असते. महाड, पोलादपूरवर आलेला प्रसंग पूराने थैमान घातले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vikas Gogavale, Anant Geete
Raigad Lok Sabha 2024: मतदारांना चकवा; रायगडमध्ये तीन गीते, तर दोन तटकरे रिंगणात; विरोधक करताहेत एकमेकांची कोंडी...

याविषयी पत्रकार विचारतात आणि हा माणूस निर्लज्यपणाने हसत आहे. मी तेथे असतो तर तेथेच उत्तर दिले असते. विकास गोगावले यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली असून या वक्तव्याची सध्या रायगड मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com