Beed Crime News : बीड हादरलं! अवैध वाळू प्रकरणात सरपंचावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, 'तुझा संतोष देशमुख करू', वाळू माफियांची धमकी; घटना सीसीटीव्ही...

Sarpanch Attacked Over Illegal Sand Excavation in Beed : बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला असून नागझरी गावाचे सरपंच यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला आहे. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी तब्बल एक तास 'रास्ता रोको' आंदोलन केले.
Crime News
Crime Newssarkarnama
Published on
Updated on

Beed Sand Mafia Attack News : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुडांच्या दहशतीने डोकं वर काढलं असून अवैध वाळू उपशाने कहर केला आहे. वाळू माफीयांनी होणाऱ्या तक्रारीवरून थेट हल्ला करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीची छाया पसरली आहे. दरम्यान नागझरी गावाचे सरपंच यांच्या घरी घुसून वाळू माफीयांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून वाळू माफियांनी तुझा संतोष देशमुखांसारखाच तुझा मर्डर करू, अशी धमकी दिली आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले असून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागझरी गावाचे सरपंच नारायण शिंदे हे जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाला विरोध करत आहेत. ते सतत याविरोधात आवाज उठवत आहेत. यावरून चिडलेल्या वाळू माफियांनी त्यांच्या घरावर हल्ला केला.

घरात घुसून शिंदे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या वेळी त्यांनी संतोष देशमुखांसारखाच तुझा मर्डर करू, अशी धमकीही दिली. या संपूर्ण हल्ल्याचे थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Crime News
Crime News : दोन अल्पवयीन बहिणींना राजकीय नेत्यांनीच वेश्याव्यवसायात ढकलले? शिंदेंचा विद्यमान अन् भाजपच्या माजी नगरसेवकासह चार जण जेरबंद

ज्यानंतर पोलिसांत या प्रकरणी फिर्याद देण्यात आली. तसेच गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र आरोपींना अटक न झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको केला. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. तर 3 किमीपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

Crime News
Crime News : राज ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट; मनसे कार्यकर्ते आक्रमक, आरोपी ताब्यात!

यावेळी संतप्त गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सरपंच नारायण शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. सरपंच नारायण शिंदे यांच्यावर झालेला हा हल्ला वाळू माफियांच्या दबाव तंत्राचा भाग असून वाळू माफियांची मुजोरी कायमची थांबवावी, असे निवेदन नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांना दिले. ज्यानंतर तहसीलदार यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन प्राप्त झाले असून ही माहिती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कळवण्यात आल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com