Shiv Sena defections : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा हादरा; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

Uddhav Thackeray Shiv Sena gains News : मुंबईतील बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Uddhav thackeray and shivsena Worker
Uddhav thackeray and shivsena WorkerSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक तोंडावर असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. विशेषता उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला आहे. मुंबईतील बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळेच निवडणूक काळात उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरही पक्षातर सुरुच आहे. अशातच आता ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

Uddhav thackeray and shivsena Worker
Ajit Pawar Vs BJP : '...तर अजित पवारांची अडचण होईल', 'त्या' वक्तव्यावर भाजपचे खुले आव्हान; रवींद्र चव्हाणांनी सगळंच सांगितलं

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रमुख लढत पहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. या काळात एकमेकांवर जोरदार टीका केला जाण्याची शक्यता आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक 28 मधील हनुमान नगर येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Uddhav thackeray and shivsena Worker
Shivsena Vs BJP : घरातील चौघांनाही निवडूण आणण्यासाठी ठाण्यातील शिवसेना नेत्याची फिल्डिंग : कट्टर विरोधक असलेल्या भाजप आमदाराची घरी जाऊन मनधरणी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महिला शाखासंघटक अश्विनी पवार, उपशाखाप्रमुख भरत पाटील, उपशाखाप्रमुख विनोद गुजर, उपशाखाप्रमुख विजय यादव, उपशाखाप्रमुख गणेश खंदारे, उपशाखाप्रमुख महेश शर्मा, उपशाखाप्रमुख सुधाकर पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी शनिवारी दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Uddhav thackeray and shivsena Worker
NCP Crisis : 'आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा, कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त पाणी भरा', संतप्त कार्यकर्त्याने अजितदादांना लिहलं पत्र

गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख संतोष राणे, गोरेगाव विधानसभा संघटक राजू पाध्ये, मालाड विधानसभाप्रमुख कैलास कणसे, उपविभागप्रमुख दिनेश राव हे नेते उपस्थित होते.

Uddhav thackeray and shivsena Worker
Congress-Shivsena UBT Alliance : पुण्यातील काँग्रेस-शिवसेना अन् मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी... भाजपवर किती भारी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com