Kolhapur News : काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद आहे. सतेज पाटील यांनी सूर्य आणि चंद्र सोडून सर्वच आश्वासन या जाहीरनाम्यातून कोल्हापूरकरांना दिली आहेत. पण त्यांना नेहमीच अशी आश्वासन देण्याची सवय असल्याचा आरोप भाजप नेते, खासदार धनंजय महाडिक यांनी केला. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी बुधवारी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, त्यावर महाडिक यांनी सडकून टीका केली.
खासदार महाडिक म्हणाले, 15 वर्षे कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, मग त्यांनी त्यावेळी या आश्वासनांची पूर्तता का केली नाही? निवडणुकीच्या तोंडावर हे का सुचत? हातातून सत्ता निघून गेलेली आहे. हे लक्षात आल्याने केवळ चंद्र आणि सूर्य सोडून अनेक गोष्टींचा आश्वासन कोल्हापूरवासियांना दिले आहे. मात्र लोक जागरूक आहेत, 15 वर्षात त्यांनी जे दिलं नाही, ते आत्ता देतो म्हणत आहेत.
काँग्रेसच्या (Congress) जाहीरनाम्यातील सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. आज काँग्रेस राज्यात आणि केंद्रात सत्तेत नाही, जिल्ह्यातील एक ही आमदार विधानसभेमध्ये नाही. मग निधी येणार कुठून? हे कोल्हापुरातले सुज्ञ नागरिक जाणतात. भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याची सांगायची वेळ त्यांच्यावर आली आहे. यातूनच सर्वांना कळते की भ्रष्टाचारमध्येच त्यांचे हात रंगले आहे, असाही आरोप महाडिक यांनी केला.
थेट पाईपलाईनमध्ये सतेज पाटील (Satej Patil) मोठा ढपला पाडला आहे, टोलची पावती त्यांनी फाडलेली आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार हे त्यांच्याकडून ऐकणं म्हणजे हास्यास्पद आहे. काँग्रेसचा फसवा जाहीरनामा लोक स्वीकारणार नाहीत, याची मला खात्री असल्याचे खासदार महाडिक म्हणाले.
दोन दिवसात महायुतीचा जाहीरनामा समोर येईल. आम्ही जे देऊ शकतो ते त्यामध्ये आहे. कारण केंद्रात आणि राज्यात सरकार महायुतीचे आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्यातील दहा आमदार महायुतीचे आहेत. आयडिल आणि स्मार्ट कोल्हापूर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा जाहीरनामा असेल, असा विश्वास महाडिक यांनी दिला.
पिंक बसवरून बोलताना महाडिक म्हणाले, कोल्हापुरातील 70 केएमटी बसेस ना दुरुस्त आहेत. त्याचा ते टायर बदलू शकलेले नाहीत, त्यामुळे काँग्रेसचे नेते कुठून पिंक बस आणणार? आज केंद्र सरकारच्या माध्यमातून 100 इलेक्ट्रिक बस कोल्हापुरात येत आहेत. त्या आम्ही आणत आहोत. त्याच्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे, दीड महिन्यात ते पूर्णत्वास येईल.
आमदार सतेज पाटील यांना निधी मागण्याचा अधिकार नाही. कारण त्यांची आमदार की चार महिन्याची राहिली आहे. जर ते गोल गोल उत्तर देत असतील तर लोक स्वीकारणार नाहीत. 2 दिवसांपूर्वी जे प्रेझेंटेशन झालं, ज्या कावळा नाका टाकीचा फोटो त्यांनी त्यांनी दाखवला ती पाण्याची टाकी 10 वर्ष बंद आहेत. राहुल गांधी यांच्यासारखे प्रेझेंटेशन करून हे तोंडघशी पडणार असल्याचे महाडिक म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.