Maratha Reservation : सरकारचा अध्यादेश कायद्याच्या चौकटीत टिकणार का ? कोल्हापुरात सकल मराठा समाजाचा सवाल...

Kolhapur Maratha Society : शासननिर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे व आनंदोत्सव साजरा करणे हे योग्य व न्यायाचे ठरणार नाही.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाने मराठा समाजाला न्याय मिळाला. राज्यात मराठा समाजात उत्साहाचे वातावरण असताना कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाने सरकारच्या अध्यादेशाला असहमती दर्शवली आहे. सरकारचा अध्यादेश कायद्याच्या चौकटीत टिकणार का ? असा सवाल उपस्थित केला आहे. (Maratha Reservation)

याबाबत सर्व बाजू तपासून उद्या रविवारी आपली बाजू पत्रकारपरिषद घेऊन मांडणार असल्याचे कोल्हापूर सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई यांनी जाहीर केले आहे. याबाबत काढलेल्या प्रेस नोट काढण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई (वाशी) येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली गेली 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ कोल्हापुरातील सकल मराठा समाज सक्रिय होता व आहे.

Maratha Reservation
Shinde Government On Alert Mode : शिंदे सरकार होते अलर्ट मोडवर; दूध, भाजीपाल्यासाठी शेतकरी आणि ग्राहकांमध्ये समन्वय !

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, यावर आजही ठाम आहोत. जरांगे यांच्या कालच्या वाशीच्या आंदोलनाविषयी मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या दोन्ही वेळेला शासनाकडून आरक्षणाची फसगत झाल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता कालचा शासन निर्णय व त्यासंदर्भातील कागदपत्रे याचा कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ञांमार्फत अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत झालेल्या शासन निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे व आनंदोत्सव साजरा करणे हे योग्य व न्यायाचे ठरणार नाही. यासाठी सकल मराठा समाज, कोल्हापूर आजचे जे काही शासनाकडून जीआर काही घोषणा झाल्या आहेत.

त्या कोर्टाच्या पायरीवर टिकणार की नाही ? याची आम्ही उद्या रविवारी (दि. 28) कोल्हापूर प्रेस क्लब दसरा चौक येथे दुपारी 12 वाजता सर्वसमावेशक चर्चा करू आणि त्या चर्चेतून जो निर्णय होईल त्याच्यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल, असे सांगण्यात आले आहे.

(Edited by Amol Sutar)

R...

Maratha Reservation
Babanrao Taywade : आम्हीही मुंबईला कूच करण्यासाठी प्रतीक्षेत | OBC

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com