Sangli Crime : स्मृती मानधनाच्या मित्राला धमकावणं पलाश मुच्छलला भोवलं; गुन्हा दाखल

Case Registered Against Palash Muchhal Under Atrocities Act : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्याशी लग्न मोडल्यानंतर चर्चेत आलेला संगीतकार तथा सिनेनिर्माता पलाश मुच्छल पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
Palash Muchhal
Palash Muchhalsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांच्या लग्नाच्या चर्चेनंतर वाद वाढला

  2. सांगलीत पलाश मुच्छलवर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

  3. या प्रकरणामुळे पलाशच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता

Sangli News : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्याशी विवाह मोडल्यानंतर चर्चेत आलेला संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज त्याच्याविरोधात विज्ञान प्रकाश माने (वय ३४, शास्त्रीनगर, सांगली) यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी मुच्छल विरोधात ‘ॲट्रॉसिटी’च्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी घडला होता.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात सांगलीत क्रिकेटपटू स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा होता. पण तो काही कारणांनी रद्द झाला. हा विवाह मोडल्यानंतर पलाश चर्चेत आला होता. विज्ञान माने यांनी जानेवारी महिन्यात पलाशविरोधात फसवणुकीची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली होती. आता पुन्हा माने यांनी त्यांच्याविरोधात जातिवाचक शिविगाळ केल्याची तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पलाश मुच्छल यांनी २०२५ मध्ये फिर्यादी विज्ञान माने यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून मुच्छल याने चित्रपट निर्मितीसाठी २५ लाख रुपये घेतले होते. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोल नाका परिसरात माने यांनी मुच्छल यांच्याकडे दिलेल्या २५ लाखांची मागणी केली.

Palash Muchhal
Bollywood celebrities Death Threats : सैफवरील हल्ल्यानंतर आता मनोरंजन विश्वातील तीन कलाकारांना जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानशी कनेक्शन?

त्यावेळी मुच्छल यांनी माने यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाशविरोधात अनुसूचित जाती व जमाती अधिनियम २०१२ चे कलम ३ (१), भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपाधीक्षक संदीप भागवत तपास करत आहेत.

Palash Muchhal
Kareena Kapoor Meet PM : तैमूर अन् जहांगीरसाठी करिनाने घेतली पंतप्रधान मोदींकडून 'ही' खास भेट

FAQs :

1. पलाश मुच्छलवर कोणता गुन्हा दाखल झाला आहे
त्याच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

2. हा गुन्हा कुठे दाखल झाला आहे
सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

3. स्मृती मानधनासोबत काय घडलं होतं
दोघांचं लग्न ठरण्यानंतर अचानक मोडलं

4. पलाश मुच्छल कोण आहे
तो बॉलिवूडमधील संगीतकार आणि सिनेनिर्माता आहे

5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो
त्याच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढू शकतात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com