Rahul Gandhi in Ashadhi Wari : राहुल गांधींना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे; चंद्रकांतदादांचा टोला

Chandrakant Patil : वयोमानानुसार प्रत्येकाला धार्मिक क्षेत्राची ओढ लागते, तशीच ओढ राहुल गांधींनादेखील लागली असावी.
Rahul Gandhi-Chandrakant Patil
Rahul Gandhi-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 07 July : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आषाढी वारीचे निमंत्रण माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे. खासदार राहुल गांधी हे आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही ‘आषाढी वारीत चालण्याचे राहुल गांधी यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे,’ अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे.

आषाढी यात्रा तयारीची (Ashadhi Wari ) पाहणी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे शनिवारी पंढरपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी गोपाळपूर रस्त्यावरील पत्रा शेड येथील दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधला. वारीतील सुविधांबाबत चर्चा करत, त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) वारीतील सहभागावर मंत्री पाटील यांनी टीका केली.

पाटील म्हणाले, यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून 17 ते 18 लाख भाविक येतील, असा अंदाज आहे, त्या दृष्टीने प्रशासनाने वारीची तयारी केली आहे. वारीमध्ये वारकऱ्यांना पाणी, आरोग्य, दिवाबत्ती आधी मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

यात्रेच्या तयारीची पाहणी करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती, त्यानुसार यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. प्रशासनाने समाधानकारक तयारी केली आहे. यात्रा काळात वारकऱ्यांना कोणताही त्रास किंवा उणीव भासू दिली जाणार नाही, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार असल्याचे आपल्याला माध्यमांमधून माहिती मिळाली आहे. विठुरायाचे दर्शन घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. वयोमानानुसार प्रत्येकाला धार्मिक क्षेत्राची ओढ लागते, तशीच ओढ राहुल गांधींनादेखील लागली असावी. त्यांना ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला.

Rahul Gandhi-Chandrakant Patil
MP Bajrang Sonwane : बजरंग बाप्पांना बालाजी पावला, सहकुटुंब जाऊन घेतले दर्शन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com