Dhangar Reservation : राज्य सरकारशी चर्चा निष्फळ; चौंडीत रूपनवर आणि बंडगरांनी उपचारही सोडले

Nagar Politics : सरकारने वेळकाढूपणाचे धोरण घेतले आहे.
Dhangar Reservation :
Dhangar Reservation : sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagar Political News : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी चौंडी येथे समाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब रूपनवर आणि संजय बंडगर उपोषण करत आहेत. ६ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या त्यांच्या या उपोषणाचा आज (23 सप्टेंबर) उपोषणाचा 18 वा दिवस आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या वतीने चौंडीत आंदोलन सुरू आहे.

Dhangar Reservation :
Ramesh Bidhuri News : भाजप खासदार विधुरींविरोधात सुप्रिया सुळे आक्रमक; हक्कभंगाचा प्रस्ताव येणार...

दरम्यान, तब्येत बिघडल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागलेले उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर यांनी काल अचानक ससूनमधील उपचार अर्धवट सोडून पुन्हा चौंडीत येत आपले उपोषण सलग सुरू ठेवले आहे, तर चौंडीतच उपचार घेत उपोषणावर असलेले संजय बंडगर यांनीही आपला ऑक्सिजन मास्क काढून टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य सरकारबरोबर 21 सप्टेंबरला झालेली चर्चा निष्फळ ठरल्याच्या निषेधार्ह या दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपचार सोडून देत आपले आंदोलन 18व्या दिवशीही पुढे सुरू ठेवले आहे.

दरम्यान, काल (22 सप्टेंबर) आ.गोपीचंद पडळकर माजी आ. प्रकाश शेंडगे, धनगर समाज युवक संघटनेचे अध्यक्ष घनश्याम बापू हाके यांनी चौंडीत येत उपोषणकर्त्यांची भेट घेतली. पडळकर यांनी चर्चेची दारे खुली ठेवा, सरकारने दोन महिन्यांत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी समिती गठीत होत आहे, असेही आंदोलनकर्त्यांना सांगितले. मात्र, सरकार केवळ आश्वासने देत असून, ठोस निर्णय होत नसल्याने समाजामध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत संयमित असलेले आंदोलन सरकारसोबत चर्चा निष्फळ ठरल्याने यापुढील आंदोलन तीव्र आणि आक्रमकपणे करण्याचे आवाहन समाजातील युवकांना करण्यात आल्याची माहिती आहे.

Dhangar Reservation :
Supiya Sule On NCP : राष्ट्रवादी कुणाची? सुप्रिया सुळेंनी दोनच शब्दांत विषय संपवला; म्हणाल्या...

योजना नको, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या :

सरकारने वेळकाढूपणाचे धोरण घेतले आहे. या बैठकीत सरकारने धनगर आरक्षणबाबत न्यायालयात जी सुनावणी चालू आहे. त्यासाठी मदत करू, धनगर समाजाच्या कल्याणासाठी १६ योजना चालू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करू असे म्हणून उपोषण मागे घ्या म्हणाले, परंतु आमची मागणी एकच आम्हाला कोणत्याच योजना नको, मंत्रिपद, आमदार, खासदार नको आम्हाला फक्त धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण चालूच राहील, असे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले स्पष्ट केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Dhangar Reservation :
Rohit Pawar News : 'मला अजितदादा व्हायचं नाही...'; रोहित पवारांनी सुनील तटकरेंना फटकारले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.