Threat To Thackeray Group Leader : 'मागच्या वेळी तू वाचलास, आता दिसशील तेथे गोळ्या घालीन'; ठाकरे गटाच्या उपनेत्याला धमकी

Solapur Political Crime : शरद कोळी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासह त्यांचे सोलापुरातील संपर्क कार्यालयही जाळून टाकण्याची धमकी या वाळू माफियाने दिली आहे. शरद कोळी हे ठाकर गटाचे सोलापूरमधील उपनेते आहेत.
Sharad Koli
Sharad KoliSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 July : 'मागील वेळी तू वाचला होता. आता तुला सोडणार नाही. जिथे दिसशील तेथे बंदुकीच्या गोळ्या घालीन,' अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना एका वाळू माफियाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. कोळी यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.

शरद कोळी (Sharad Koli) यांना गोळ्या घालून ठार मारण्यासह त्यांचे सोलापुरातील (Solapur) संपर्क कार्यालयही जाळून टाकण्याची धमकी या वाळू माफियाने दिली आहे. शरद कोळी हे ठाकर गटाचे (Thackeray Group) सोलापूरमधील उपनेते आहेत.

फिर्यादीनुसार, शरद कोळी यांनी यापूर्वी वाळूमाफियाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देऊन कारवाई करण्यास भाग पाडले आहे, त्याचा राग मनात धरून शनिवारी सायंकाळी संतोष पाटील यांच्या फोनवर अण्णाराव ऊर्फ पिंटू पाटील (रा. शेगाव, ता. अक्कलकोट) यांनी फोन केला होता.

गेल्या वेळी काही लोक अंगावर घालून तूला गोळ्या घातल्या होत्या, परंतु त्यातून तू वाचला होता. आत्ता तुला सोडणार नाही, जिथे दिसेल तिथे तुला बंदुकीच्या गोळ्या घालण्यात येतील, त्यासंदर्भात काही लोकांना मी सांगितले आहे. तसेच, शरद कोळी यांचे सोलापूर येथील संपर्क कार्यालयही जाळून टाकीन, अशी धमकी अण्णाराव पाटील यांनी संतोष पाटील यांच्या फोनवरून शरद कोळी यांना दिली आहे.

Sharad Koli
Rajan Patil Announcement : मोहोळ विधानसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; राजन पाटलांनी मताधिक्याचा आकडाही जाहीर केला!

संतोष पाटील यांनी ही माहिती शरद कोळी यांना दिल्यानंतर त्यांनी अण्णाराव ऊर्फ पिंटू पाटील याच्या विरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शरद कोळी यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता. त्या हल्ल्यानंतर कोळी यांना दोन बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. मात्र, काही दिवसांनंतर त्यांचा पोलिस बंदोबस्त काढून घेण्यात आला होता.

Sharad Koli
Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंची घरवापसी की उमेदवारीसाठी गाठीभेटी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com