Uddhav Sena News : सांगलीत उद्धव सेना आक्रमक, काय दिला काँग्रेसला इशारा !

Sangli District Congress : महाविकास आघाडीत गद्दारी करून लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा जिंकल्यानंतर काँग्रेसला आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटू लागले आहे. दोन्ही काँग्रेसचे नेते जागांबाबत घोषणा करीत आहेत.
Uddhav thackeray Nana Patole
Uddhav thackeray Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते विधानसभा मतदारसंघाचे गणित मांडू लागले आहेत. या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना प्रचंड अहंकार आहे. त्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभेच्या जागा लढवेल, असा इशारा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिला.

जिल्हाप्रमुख विभुते म्हणाले, सांगलीची जागा अपक्षाला त्यांच्या एकट्याच्या ताकदीवर मिळाली नाही. भाजपचे नेते माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख, खानापुरात शिंदेसेनेच्या गटाने संजय पाटील यांची हुकुमशाही संपविण्यासाठी अपक्षाला मदत केली.

संजय पाटील यांना त्यांची जागा दाखविली. मात्र, महाविकास आघाडीत गद्दारी करून सांगलीची जागा जिंकल्यानंतर काँग्रेसला आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटू लागले आहे. दोन्ही काँग्रेसचे (Congress) नेते जागांबाबत घोषणा करीत आहेत. परंतु, महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) पक्षही दर आहे. याची त्यांनी जाणीव ठेवावी.

Uddhav thackeray Nana Patole
Video Legislative Council Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीविरोधात ठाकरे गट न्यायालयात जाणार; नेमकं कारण काय?

राज्यात काँग्रेसला नव्याने मिळालेल्य खासदारकीच्या जागा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या झंझावाती प्रचारामुळे मिळाल्या आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात खानापूर सांगली व मिरज' या तीन जागा शिवसेनेला सोडाव्यात. उर्वरित पाच जागांवर दोन्ही काँग्रेसने आपसात चर्चा 'करून प्रश्न सोडवावा, अन्यथा सर्व आठ जागांवर उद्धवसेना निवडणूक लढवेल, असा इशाराच शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला.

Uddhav thackeray Nana Patole
Video Uddhav Thackeray : 'ते' पराभव उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी, भर मेळाव्यात बोलले...

वैभवदादांना शिवसेनेची ऑफर

महायुती किंवा महाविकास आघाडी होत असताना जेथे विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे, त्याच पक्षाला तेथील जागा मिळणार आहे. त्यामुळे खानापूरची जागा शिंदे गटालाच मिळणार असल्याचे सर्वज्ञात आहे.

तरीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी खानापुरातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. पण, त्यांना उमेदवारी मिळणार नाही, हेही निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश करावा, आम्ही त्यांना उमेदवारी देऊन निवडूनही आणू, अशी थेट ऑफर संजय विभुते यांनी दिली.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Ramesh Chennithala
Congress leader Harshvardhan Sapkal extends support to Uddhav Thackeray for Legislative Council election.
Uddhav Thackeray
Sunetra Pawar, Sharad Pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com