Lok Sabha Election 2024: शिंदे गटाच्या खासदाराची भाषा बदलली;म्हणाले,'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही...'

Shivsena News : 'आमचे 18 खासदार निवडून आले होते, मग...', असंही खासदारांनी म्हटलं आहे.
ajit pawar eknath shinde devendra fadnavis
ajit pawar eknath shinde devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावर तोडगा काढला जात आहे. महायुतीत भाजप 32, शिवसेना शिंदे गट 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. पण, शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलाे नाही. 18 जागा लढविण्यावर ठाम आहोत,' असं किर्तीकरांनी म्हटलं आहे.

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Sharad Pawar : अजित पवारांचे पुतणे तुमच्याबरोबर आले तर स्वागत करणार का? शरद पवार म्हणाले, "कुणी..."

गजानन किर्तीकर ( Gajanan Kirtikar ) यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, "हे धोरण अद्याप ठरलेलं नाही. तसेच, अधिकृत घोषणा झाली नाही. या आकड्यांना कोणताही आधार नाही. यावर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील ( Shivsena ) प्रमुखांनी चर्चा केली का? हे आम्हाला माहिती नाही. जागावाटपाबाबत मुख्य नेते माझ्यासह अन्य नेत्यांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे; पण अद्याप चर्चा झाली नाही. 22 जागांवर आमचा दावा असून 12 जागा अमान्य आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Sharad Pawar : "त्यांना मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे," अमित शाहांच्या टीकेचा पवारांनी घेतला समाचार; म्हणाले...

"2019 मध्ये भाजपचे 23 आणि शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या वाट्यातून राष्ट्रवादीला जागा द्याव्यात. शिवसेनेच्या 13 खासदारांचं राजकीय भविष्य स्थिर करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंवर आहे. ते कुणाला दगा देणार नाही," अशी आशा किर्तीकरांनी व्यक्त केली. ( Lok Sabha Election 2024 )

"भाजप आम्हाला जागा देणार आणि आम्ही घेणार अशी स्थिती नाही. आमचे 18 खासदार निवडून आले होते. तेवढ्या जागा शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. आम्ही आमच्या जागेवर ठाम असायला पाहिजे, असं माझं मत आहे. शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही बांधू देणार नाही. 18 जागा लढविण्यावर ठाम आहोत. आमचे प्रमुख काय म्हणतात मला माहिती नाही," असं किर्तीकरांनी म्हटलं.

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Yugendra Pawar : सुप्रियाताईंना विन करण्यासाठी युगेंद्र पवार बारामतीच्या रणांगणात

"जेवढ्या जागा शिंदे गटाला तेवढ्याच आम्हाला"

जागावाटपाबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर असल्याचं सांगितलं जात आहे. याबद्दल मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "जागावाटपाच्या धोरणाबाबत मला माहिती नाही, पण शिवसेना शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात ही आमची मागणी आहे."

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Pune Lok Sabha Election 2024 : चार वेळा सर्व्हे करूनही भाजपचा उमेदवार ठरेना, आता 'या' निकषावर मदार

दरम्यान, महायुतीत लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक 32 जागा भाजपला मिळतील, तर शिवसेना शिंदे गटाला 12 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते.

R

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Sharad Pawar : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामागचं शरद पवारांनी सांगितलं 'कारण', म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com