Death Threat To Sushma Andhare : 'ऑपरेशन टायगर'ला नवं वळण: ठाकरेंच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी?, अंधारेंनी फोन नंबरच फेसबुकवर शेअर केला

Nagesh Ashtikar Supporter Death Threat To Sushma Andhare : राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरमुळे राजकीय भूकंप आला असून आता त्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून'ऑपरेशन तुटवा'ने इशारा देण्यात आला आहे.
Nagesh Ashtikar and Sushma Andhare
Nagesh Ashtikar and Sushma Andharesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political crisis news : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचे तब्बल सहा खासदार गळाला लावत एकाआर्थी शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घातला आहे. एकाच वेळी सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने ऑपरेशन टायगर पुर्ण झाल्याचे बोलले जात आहे. यावरून सध्या दोन्ही शिवसेनेतील नेते एकमेकांवर जोरदार निशाना साधताना दिसत आहेत.

दरम्यान दोन्ही शिवसेनेतील नेत्यांमधील शाब्दिक वाद आता टोकाला गेला असून या वादाला वेगळंच वळण मिळाल्याचे दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनाच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. हा खळबळजनक आरोप अंधारे यांनी फेसबुकवर एक फोन नंबर शेअर करत केला आहे. तर यावेळी त्यांनी बंडखोर खासदार नागेश आष्टीकर यांचे नाव घेत हा नंबर यांच्या माणसाचा असल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात 'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदार फुटले आहेत. यामुळे एकीकडे जोरदार राजकीय संघर्ष होताना दिसत असून शिवसेना देखील आता रस्त्यावर उतरण्याची तयारी करताना दिसत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'ला 'ऑपरेशन तुटवा'ने ठाकरेंच्या शिवसेनेकडून इशारा देण्यात आला आहे. याच इशाऱ्यांमुळे बंडखोर खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता आमने-सामने येताना दिसत आहेत.

Nagesh Ashtikar and Sushma Andhare
Sushma Andhare : 'तुझ्या डोक्यावर टोपी, माझ्या डोक्यावर...', शहांच्या 'त्या' कौतुकामागे मोठा गेम प्लॅन? ठाकरेंच्या नेत्याचा दावा!

दोन्ही शिवसेनेत वाढवेल्या वादाच्या दरम्यान आता सुषमा अंधारे यांना खासदार नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंधारे यांनीच याबाबत आरोप केला असून त्यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर याची माहिती दिली आहे.

अंधारे यांनी फेसबुकवर आष्टीकरच्या माणसाचा फोन नंबरच शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच आष्टीकरच्या माणसाने या फोन नंबर वरून आताच मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेश टायगर' च्या गदारोळाला वेगळंच वळण मिळालं असून अंधारे यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

Nagesh Ashtikar and Sushma Andhare
Sushma Andhare: "तीच पद्धत... तीच स्टाईल! भाजपने स्पष्ट संदेश दिलाय..."; तृणमूल खासदारांच्या गटाच्या विलीनीकरणावर सुषमा अंधारेंचं कठोर भाष्य

अंधारे यांनी आपल्या फेसबुकवर "गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता खून करण्यापर्यंतची सवलत देणार आहे का? असा सवाल केला आहे. तसेच आष्टीकर मी तुमच्या धमकीच स्वागत करते, Challenge accepted, असंही म्हणत सुषमा अंधारे यांनी कडक शब्दात आष्टीकर यांना सुनावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Priyanka Chaturvedi
Doctors and nurses protest after the alleged assault at KDMC Shastrinagar Hospital by Shiv Sena corporator Ramesh Mhatre and his supporters.
Sushma Andhare
Sushma Andhare
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com