Kunal Kamra Song : तोडफोडीनंतर शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने कुणाल कामराचं शिंदेंवरील ‘ते गाणं’ पाहण्याची व्यक्त केली इच्छा!

Bharat Gogawale Statement : आदित्य ठाकरे यांचे समाधान आता कधीच होऊ शकत नाही. ते ज्यावेळी सत्तेवर हेाते, त्या वेळी त्यांनी किती लोकांचं समाधान केलं? त्या ठिकाणी बाकीचेही आमदार होते, एकटे आदित्य ठाकरे होते, अशातला भाग नाही.
Kunal Kamra-Eknath Shinde
Kunal Kamra-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 24 March : स्टॅडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या गाण्यातील नेमकं काय बोचलं, या प्रश्नावर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी हसत हसत ‘आम्हीपण अजून तसं ते गाणं पाहिलेलं नाही. पण आता ते पाहणे गरजेचे आहे,’ असे सांगून ते पाहण्याची इच्छा बोलून दाखवली.

कुणाल कामरा (Kunal Kamra) याने ‘थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चश्मा, हाये’ हे व्यंग्यात्मक गाणं सादर केले होते. त्यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी कामरा याचा मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली आहे. तसेच हा विषय विधानसभेतही उपस्थित करण्यात आला हेाता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

कामरा याच्या त्याच गाण्यातील नेमकी कोणती गोष्ट बोचली, असा जेव्हा भरत गोगावले (Bharat Gogawale ) यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी आपण ते गाणं पाहिले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र एवढा मोठा गदरोळ झाल्यानंतर मात्र गोगावले यांनी ते गाणं पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

Kunal Kamra-Eknath Shinde
Ashok Pawar Politic's : अशोक पवारांनी तोंडात घास देऊन मानेवर बुक्की मारली, त्रास सोसावा लागला; साथ सोडलेल्या नेत्याने सांगितली आपबिती

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत मुंबई शहरात करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रीटकरण रस्त्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांनी थातूर मातूर उत्तरे दिली, असे म्हटले होते. त्याला रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी उत्तर दिलं.

गोगावले म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे समाधान आता कधीच होऊ शकत नाही. ते ज्यावेळी सत्तेवर हेाते, त्या वेळी त्यांनी किती लोकांचं समाधान केलं? त्या ठिकाणी बाकीचेही आमदार होते, एकटे आदित्य ठाकरे होते, अशातला भाग नाही. एकनाथ शिंदे यांनी जी बैठक घेतली होती, ती योग्य उत्तर देण्यासाठीच घेतली होती आणि शिंदे यांनी ते दिलेले आहे.

Kunal Kamra-Eknath Shinde
Shirur Politic's : अशोक पवारांना मोठा धक्का, दोन नव्हे तब्बल चार संचालक फुटले; शिरूर खरेदी विक्री संघावर अजितदादा गटाचे वर्चस्व!

एकनाथ शिंदे यांच्याकडे एमएसआरडीसी हे खातं आहे, त्यामुळे त्यांनी याबाबतच्या प्रश्नाला उत्तरे दिली आहेत, त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून एकत्र येऊन शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला, असे नाही. तो मुंबईतील रस्त्याचा प्रश्न होता, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com