Maharashtra Cabinet Meeting : अजित पवारांना कुठलं खातं मिळणार ? आज मंत्रिमंडळाची बैठक

Cabinet And NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कुठल्या मंत्रालयाची जबाबदारी मिळणार ?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Cabinet Meeting With NCP : राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानंतर आज बुधवारी (ता. ४) मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होत आहे. यापूर्वी सरकारमध्ये नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ मंत्र्यांना कुठले खाते मिळणार? याची सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, कालपर्यंत एकमेंकावर सडकून टीका करणारे आज या बैठकीनिमित्त मांडीला मांडी लावून बसणार आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Maharashtra Political Crisis : 'सिल्वर ओक'वर शरद पवार यांची कायदेतज्ज्ञांशी खलबतं? नव्या नियुक्त्यांमुळे पेच...

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (दि.२ जुलै) मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीत उभी फूट पडून विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाब आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळाची नव्याने सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपस्थित आज दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Darshana Pawar Killing Case : दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपटेड; राहुल हंडोरेची....

आज होणाऱ्या या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात येईल. त्यांना कुठली खाती मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागेल आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. सध्या हे खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. भाजपच्या मंत्र्यांकडे असलेल्या अतिरिक्त खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे. यात अर्थ आणि महसूल खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच परिवहन आणि महिला व बालकल्याण खातेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याला दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Rashtrawadi News: फांद्या कुठेही जावो आम्ही मूळ आणि खोड यांच्याशी नाते तोडणार नाही, कार्यकर्त्यांचा निर्धार...

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाली आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कुठली खाती मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.