Pune: पुण्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ; स्टील कंपनीच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार

Pune Firing News, Lawrence Bishnoi Gang, Extortion Threat: पुण्यातील फुरसुंगी येथील स्टील कंपनीच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार झाला. खंडणीच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाल्याचा दावा असून, लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आले आहे.
Lawrence Bishnoi gang
Lawrence Bishnoi gangSarkarnama
Published on
Updated on

Lawrence Bishnoi Gang: पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे काल रात्री एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीच्या फोनकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून हा गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले असून, कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडिया पोस्टद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील व्यापारी आणि व्यावसायिक वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाईकवरून आले अन्...

प्राथमिक माहितीनुसार, मंतरवाडी भागातील एच विकास स्टील या कंपनीच्या कार्यालयाला लक्ष्य करून हा गोळीबार करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी संबंधित फॅक्टरीच्या मालकाला फोनवरून खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. काल रात्री एका दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण फॅक्टरीबाहेर आले. त्यांनी आपल्या जवळील पिस्तूलमधून थेट कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड फायर केले आणि तिथून पळ काढला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.

Lawrence Bishnoi gang
Maharashtra Politics Live Update : विजय पाटकर यांच्यावर मेघराज भोसले यांचा पलटवार; 'माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा...'

सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

गोळीबाराच्या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, शुभम लोनकर आणि टायसन बिश्नोई यांनी या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे.

व्हायरल पोस्टमधील धमकी

"आम्ही अमूल चमारिया आणि सनी चमारिया यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी आमच्या इशाऱ्याकडे आणि कॉल्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आमचे कॉल इग्नोर केल्यामुळेच हा गोळीबार करण्यात आला आहे. यावेळी गोळी फक्त दरवाजावर लागली आहे, पण जर आताही सुधारले नाही, तर पुढची गोळी थेट छातीत लागेल." पुढे या पोस्टमध्ये आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमक्याही देण्यात आली आहे.

Lawrence Bishnoi gang
Pune: ‘मला अंकलजी म्हणा’... पण घरात पाया पडा! भोंदू राधामोहन मिश्राचे अजब आणि अघोरी कारनामे

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी फॅक्टरीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून गोळीबार करणाऱ्या आरोपींचा माग काढला जात आहे. हा प्रकार केवळ खंडणीसाठी झाला आहे, की त्यामागे काही व्यावसायिक वाद किंवा इतर आंतरराज्य टोळ्यांचा संबंध आहे, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील त्या धमकीच्या पोस्टची सत्यता आणि त्यामागे खरोखरच लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का, याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com